Home > Max Woman Blog > इरफान राजघराण्याशी संबंध असलेला साहबजादा होता हे तुम्हाला माहितेय का?

इरफान राजघराण्याशी संबंध असलेला साहबजादा होता हे तुम्हाला माहितेय का?

इरफान राजघराण्याशी संबंध असलेला साहबजादा होता हे तुम्हाला माहितेय का?
X

राजस्थानातल्या टोंक गावात ७ जानेवारी १९६७ ला इरफानचा जन्म झाला... त्यांचे पूर्ण नाव - साहबजादा इरफान अली खान. त्यांच्या आईचे राजघराण्याशी संबंध होते आणि त्यांच्या वडिलांनी टायरचा उद्योग स्वतः उभारत त्यातून भरपूर पैसा मिळवलेला होता. वडील गेल्यानंतर टायर बिझनेसची सूत्रं इरफान आपल्या हाती घेतील, असं घरच्यांचा अंदाज होता. पण त्यांनी तसं केलं नाही. 'अॅक्टर' होण्यावर इरफान ठाम होते.

Courtesy : Social Media

"मी अॅक्टर होईन अशी कल्पनाही कधी कोणी केली नव्हती. मी अगदी लाजाळू होतो, बारीक होतो. पण माझी अगदी मनापासून इच्छा होती," इरफान यांनी सांगितलं होतं.

१९८४ मध्ये त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. आपल्याला थिएटरचा अनुभव असल्याचं खोटंच सांगत त्यांनी प्रवेश मिळवला. याच ड्रामा स्कूलमध्ये त्यांना त्यांची लाईफ पार्टनर मिळाली. "तो कायम फोकस्ड असायचा. मला आठवतंय, घरी आल्यानंतरही तो थेट बेडरूममध्ये जाई आणि जमिनीवर बसून पुस्तकं वाचायचा. बाकीचे आम्ही मात्र गप्पा टप्पा करत बसायचो," इरफानची पत्नी सुतपा सिकदर यांनी सांगितलं होतं. त्या लेखिका आहेत.

Irfan Khan and wife Sutapa Sikdar Courtesy : Social media

इरफान खान यांना सिनेमांमध्ये काम करण्यात रस होता. पण त्यांच्या अभिनयाच्या कारकीर्दीतले सुरुवातीचे रोल होते टीव्ही क्षेत्रातले. त्याकाळात केबलवरच्या डझनभर चॅनल्सवर अनेक मालिका सुरू होत्या. काम मिळत होतं, पण त्यातून समाधान मिळत नव्हतं.

इरफान यांनी जवळपास दशकभर झी आणि स्टार वाहिनीच्या मालिकांमध्ये काम केलं. या काळात अगदी अभिनय सोडून देण्याचा विचारही त्यांच्या मनात आला होता.पण पुढे त्यांना चंद्रकांतामध्ये इरफान खान यांना ब्रद्री चा रोल मिळाला आणि ही भूमिका खूप प्रसिद्ध पावली.

Irfan's Badri Roll in Chadrakanta Courtesy : Social media

मोठ्या पडद्यावरचं त्यांचं आगमनही तसं त्यांच्यासाठी कठीणच ठरलं. सिनेमामधली त्यांना मिळालेली पहिली भूमिका होती मीरा नायर यांच्या 'सलाम बॉम्बे' चित्रपटातली. या सिनेमाला ऑस्करसाठी नामांकनही मिळालं होतं. यातल्या एका तरुणाची भूमिका इरफान यांनी केली, पुढे त्यांना यश मिळालं ते 'द वॉरियर' या ब्रिटिश-इंडियन फिल्ममुळे. या सिनेमाचं चित्रीकरण हिमालयात आणि राजस्थानच्या रखरखीत वाळवंटात करण्यात आलं होतं.

ब्रिटीश दिग्दर्शक आसिफ कपाडियांची ही पहिली फिल्म होती. प्रथितयश बॉलिवुड स्टार परवडणारा नसल्याने ते एका गुणी, पण अनोळखी अभिनेत्याच्या शोधात होते. यातल्या योद्ध्याची भूमिका इरफान यांनी बजावली.

बाफ्ता पुरस्कारांमध्ये या सिनेमाला पुरस्कार मिळाला आणि ऑस्करसाठी युकेकडून ही फिल्म पाठवण्यात येणार होती. पण ही फिल्म हिंदी भाषेत असल्याने असं होऊ शकलं नाही.

या फिल्मच्या यशासोबतच इरफानचं फिल्मी करियर सुरू झालं आणि पुढची दोन दशकं त्यांनी दरवर्षाला पाच वा सहा सिनेमे केले. त्यांना पहिली संधी देणाऱ्या मीरा नायर यांच्यासोबत पुढे २००६मध्ये त्यांनी नेमसेक आणि २०१० मध्ये 'न्यूयॉर्क, आय लव्ह यू' असे सिनेमेही केले.',अ मायटी हार्ट' सिनेमात त्यांनी एका पाकिस्तानी पोलिसाची भूमिका बजावली तर फक्त इरफानसोबत काम करता यावं म्हणून वेस अँडरसन यांनी त्यांच्या 'द दार्जिलिंग लिमिटेड' सिनेमात एक लहानसा रोल लिहीला.२००८ मध्ये आलेल्या डॅनी बॉयल यांच्या 'स्लमडॉग मिलियनेर (स्लमडॉग करोडपती)' सिनेमात त्यांनी एका पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका बजावली. इरफानचा अभिनय पाहणं एक पर्वणी होती, असं डॅनी बॉयल यांनी म्हटलं होतं.

Courtesy: Social Media

स्लमडॉगच्या यशानंतर इरफान कारकीर्दीच्या अशा टप्प्यावर होते, जिथे ते निवडक भूमिका स्वीकारू शकत होते.

भूमिका निवडण्याविषयी एकदा इरफाननी सांगितलं होतं, "मी अशा फिल्म्स करायचा प्रयत्न करतो ज्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो. असे सिनेमे जे तुमच्याशी बोलतात, आणि एकदा पाहून झाल्यावरही पुन्हा पुन्हा आठवत राहतात. माझं अशा फिल्म्सना प्राधान्य असतं ज्यांच्यासोबत तुमचं नातं दीर्घकाळाचं असतं."

Courtesy : Social Media

'द लंचबॉक्स' या सिनेमातले साजन फर्नान्डिस कायम सर्वांच्या लक्षात राहतो पण धर्माशी वा संस्कृतीशी अगदी जवळचा संबंध असलेल्या भूमिका स्वीकारणं, ते टाळत. याच कारणामुळे त्यांनी दीपा मेहतांचा 'मिडनाईट्स चिल्ड्रन' आणि मीरा नायर यांचा 'रिलक्टंट फंडामेंटलिस्ट' सिनेमा नाकारला होता.

Irfan Khan In Lunch Box Courtesy : Social media

इरफान खान यांनी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केलं.आंग ली यांच्या 'लाईफ ऑफ पाय' मधली त्यांची पिसीनची भूमिका गाजली. सोबतच त्यांनी 'अमेझिंग स्पायडरमॅन' सिनेमात रजत रत्ना या वैज्ञानिकाची तर ज्युरासिक वर्ल्ड सिनेमात सायमन मसरानी या ज्युरासिक वर्ल्डच्या अब्जाधीश मालकाची भूमिका केली.

हिंदी चित्रपटांतल्या अजरामर भूमिका

लंचबॉक्स, मदारी, पानसिंग तोमर, मकबूल या सिनेमांतल्या इरफान यांच्या भूमिका वाखाणल्या गेल्या.

अभिनय देव यांच्या 'ब्लॅकमेल' सिनेमातही त्यांची भूमिका होती. अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण यांच्या भूमिका असणारा पिकू, आकर्ष खुराणांचा कारवाँ, होमी अदजानिया यांचा हिंदी मीडियम हे त्यांचे गेल्या काही काळातले गाजलेले चित्रपट.

इरफान यांची प्रमुख भूमिका असणारा 'अंग्रेजी मीडियम' काही काळापूर्वी रिलीज झाला. पण तब्येत बरी नसल्याने इरफान या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सहभागी झाले नाहीत.

Irfan Khan in Pansing Tomar Courtesy : Social Media

कला क्षेत्रातल्या त्यांच्या याच योगदानाबद्दल २०११ मध्ये त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला.२०१३ साली आलेल्या पानसिंग तोमर चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी मीडियम चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.

I am all in favor of spontaneity, providing it is carefully planned and ruthlessly controlled. जॉन गिलगुड या महान इंग्लिश नटाचं हे म्हणणं आहे आणि ते सहजपणे इरफ़ानच्या अभिनयात यायचं.

इरफ़ान नट नव्हता. अभिनेताही नव्हता. त्याच्या देहबोलीत मन असायचं. मनबोलीत देह असायचा. तो भूमिकेची सावली असायचा. त्या सावलीचे काही आकार प्रेक्षकांनी साकारावेत अशा जागा त्याच्या अभिनयात निर्माण व्हायच्या. त्याच्या भूमिकेला तो स्वायत्त होऊ द्यायचा. त्यावर आरूढ नाही व्हायचा. भुमिकेला तिचा तिचा असा अर्थ घेऊ देणारी एक अलिप्तता त्याच्या अभिनयात होती.

Irfan Khan In Karwan Courtesy : Social Media

सर्वसाधारण चेहरेपट्टी मात्र कमालीचे भेदक डोळे असलेल्या या कलाकाराने सर्वसामान्यांना सुसह्य वाटणाऱ्या, कॉम्प्लेक्स न देणाऱ्या मात्र तरीही मनोरंजन करणाऱ्या सशक्त भूमिका साकारल्या आणि 30 वर्षांच्या अखंड मेहनतीनंतर हिंदी सिनेमाच्या ‘एंटरटेन्मेंट की परिभाषा’ बदलण्याची किमया केली. दक्षिण आशियायी सिनेमा आणि हॉलीवूड यांच्यातील तो महत्त्वाचा दुवा होता. त्याहून महत्त्वाचे म्हणजे आर्ट फिल्म/समांतर सिनेमा आणि कमर्शियल सिनेमा आणि त्यांचे चाहते या दोन बेटांना जोडणारा इरफान एक पूल होता.

इरफानचा अकाली मृत्यू जगभरातील सिनेमाप्रेमींना चटका लावून गेलाय. चीनी सोशल मिडिया साईट्सवर कोट्यावधी लोकांनी त्याच्या सिनेमा आणि अभिनयावर चर्चा करणारे थ्रेड्स सुरु केलेत. अनेक आंतरराष्ट्रीय कलाकार आणि दिग्दर्शक इरफानच्या अभिनयाची, त्याच्या अकाली जाण्यामुळे जागतिक सिनेमाच्या झालेल्या हानीची भावूकपणे चर्चा करताहेत.

Courtesy : Social Media

ऑस्कर्स अर्थात अ‍ॅकॅडमी अवार्ड्स देणाऱ्या संस्थेपासून ते त्याचे फोटो स्टेट्सला ठेवणाऱ्या सर्वसामान्य लोकांनाही आपल्या जवळचा, घरातला कुणीतरी गेल्यासारखे दु:ख झालेय. इरफानच्या या युनिवर्सल अपीलचे रहस्य काय असावे? त्याच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘हम जितना पर्सनल होंगे, जमीन से जुडी फिल्मे करेंगे उतनेही हम युनिवर्सल होते चले जायेंगे...’

पानसिंग तोमर’ या सिनेमाविषयी आणि तो करण्या मागच्या भूमिकेविषयी जेएनयुमध्ये बोलताना इरफान म्हणाला होता की,

‘मैं बहुत छोटेसे गाँव की पैदाइश हुं. सिनेमा में जाने का ख्वाब देखता तो था, पर शर्माते हुए... सिक्रेटसा ख्वाब था. पानसिंग के बाद इंटरव्यू के दौरान मुझे एक पत्रकार ने पूछा की आप ये ‘आम आदमी’ टाइप फिल्मेंं ही क्यूँ करते है. मैंने उन्हें समझाने की कोशिश नहीं की के आम आदमी ही तो हीरो होता है, उसीसे तो हीरो निकलता है.

बिते दस-बारा साल से मैं और तिग्मांशु मिलकर एंटरटेन्मेंट की परिभाषा बदलने की, उसे रीडिफाइन करने की कोशिश कर रहे थे. स्टार बेस्ट सेलर्स, हासिल और अब पानसिंग इसी जद्दोजहद का नतीजा है. हम उस तरह का सिनेमा बनाना चाहते थे जिसका दौर पहले रहा है.

जब हमारा देश आज़ाद हुआ था. उम्मीदे जवान थी, लग रहा था की मंजिल करीब है. एक ऐसी दुनिया बनेगी जो सपनो की दुनिया है. गुरुदत्त, के आसिफ, बिमल रॉयने जो आम आदमी का सिनेमा बनाया वो आगे खो गया. तो हमारी भी यही कोशिश थी की हमारी अपनी, जमीन से जुडी हुई कहानी हो. और उसमे एंटरटेन्मेंट भी हो.

पर हमारे यहाँ हीरो आने लग गए जो पता नही कहाँ की पैदाइश है, बिलकुल जमीन से जुड़ाव नहीं था, पर उन्होंने ऑडीयन्स कॅप्चर किया और सिनेमा का पतन हुआ. पर अब दर्शकोंकी नयी पीढ़ी आयी है, जो अपनी कहानी देखना चाहती है. पानसिंग की कामयाबी इसी का सबूत है."

'पानसिंग'मुळे इरफानच्या अभिनय क्षमतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. यानंतर हॉलीवूडमधून त्याला पुन्हा अनेक ऑफर्स येऊ लागल्या. त्याने त्या स्वीकारल्याही. ‘लाईफ ऑफ पाय’ या ऑस्कर विजेत्या सिनेमातील त्याच्या अभिनयाने हॉलीवूडकर पुन्हा चकित झाले. यानंतर बहुदा इरफानमधील अस्वस्थता संपली असावी. आपल्या नावातील साहबजादे काढून त्याने नावापुरत्या असलेल्या आपल्या नवाबी पार्श्वभूमीचे ओझे त्याने पूर्वीच उतरवले होते. आता आडनावातील खानही काढून त्याने आपल्याला फक्त इरफान म्हणून ओळखले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याने स्वतःला पठडीत अडकवून न घेता मुक्त राहणे पसंद केले.

२०१८ साली इरफान खान यांना एका दुर्मीळ कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हापासून ते या आजाराशी झुंजत होते. त्यांच्या सानिध्यात जे पण आले त्यांना देखील इरफान यांच्या लढ्यातून प्रेरणा मिळाली होती. या शतकातला सर्वोत्तम अभिनेता, भुमिका घेणारा, जिंवत भुमिका चितारणारा, जागतिक स्तरावर काही बोटावर मोजण्याइतक्या भारतीय अभिनेत्यानी आपला ठसा उमटविला त्यापैकी एक म्हणजे इरफान खान यांचा उल्लेख करता येईल , सकस भूमिका, अप्रतिम संवाद फेक, वाचिक अभिनयाचा महामेरु...

Courtesy : Social media

मार्च २०१८ ला इरफान यांनी त्यांना गंभीर आजार झाला असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सगळेच जण इरफान यांना नेमका कोणता आजार झाला याचा अंदाज लावत होते. पण नंतर इरफान खान यांनी स्वतः त्याला 'न्युरोएंडोक्राईन ट्यूमर' झाल्याचं ट्वीट करून स्पष्ट केलं.

एनएचएस डॉट युके यांच्याकडील माहितीनुसार, न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर हा एक दुर्मीळ प्रकारचा ट्यूमर असून तो शरीराच्या विविध भागात निर्माण होऊ शकतो. हा ट्यूमर जास्तकरून आतड्यांमध्ये होतो. रक्तामध्ये हार्मोनचे वहन करणाऱ्या रक्ताच्या पेशींवर या ट्यूमरचा सुरुवातीला परिणाम होतो. हा आजार बऱ्याचदा मंद गतीने वाढतो. प्रत्येक प्रकारात असं होईलच असंही नाही.

रुग्णाच्या शरीरातल्या कोणत्या भागात ट्यूमर आहे, यावरून लक्षणं कोणती आहेत हे ठरतं. जर ट्यूमर पोटात असेल तर पोटाच्या तक्रारी सतावतात. फुप्फुसात असल्यास कफाचा त्रास जाणवत राहतो. तसंच, हा आजार झाल्यानंतर रुग्णाचे ब्लड प्रेशर आणि रक्तातली साखर यांचे प्रमाण वाढतं किंवा घटत राहतं.

या आजाराची नेमकी कारणं काय आहेत याच्या निष्कर्षाप्रत अद्यापही डॉक्टर पोहोचू शकलेले नाहीत. न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर होण्याची कारणं अनेक असू शकतात. तसंच हा आजार अनुवांशिकरित्याही होऊ शकतो. आणि असा अतिशय प्रतिभावंत कलाकार आपल्याला २९ एप्रिल २०२० ला कायमचे सोडून गेले.

  • विकास परसराम मेश्राम

Updated : 3 May 2020 6:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top