Home > Max Woman Blog > राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाला सुरुवात

राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाला सुरुवात

राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाला सुरुवात
X

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाला सुरुवात झाली आहे.

आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी राजमाता जिजाऊ यांचे वंशज शिवाजी राजे जाधव आणि मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी राजमाता जिजाऊ चे जन्मस्थान असलेल्या राजवाड्यात अभिवादन केले.

ह्या उत्सवासाठी देशभरातील हजारो जिजाऊ प्रेमी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत. सकाळ पासुनच जिजाऊंच्या शिवप्रेमीची व जिजाऊ प्रेमी यांची रिघ लागली आहे. मराठा सेवा संघाच्या वतीने दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

Updated : 12 Jan 2020 6:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top