Home > Max Woman Blog > इशा अंबानी यांनी विकला जेनिफर लोपेझ यांना बंगला; किंमत बघून थक्क व्हाल !

इशा अंबानी यांनी विकला जेनिफर लोपेझ यांना बंगला; किंमत बघून थक्क व्हाल !

इशा अंबानी यांनी विकला जेनिफर लोपेझ यांना बंगला; किंमत बघून थक्क व्हाल !
X

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील ईशा अंबानी Isha Ambani आणि आनंद पिरामल Anand Piramal यांचा आलिशान बंगला हॉलिवूड गायिका जेनिफर लोपेझ आणि अभिनेता बेन ऍफ्लेक यांनी विकत घेतला आहे. हा बंगला 500 कोटींहून अधिक रुपयांना विकला गेला आहे. म्हणून दिग्गज उद्योगपती आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी Mukesh Ambani यांची मुलगी ईशा अंबानी तिच्या बंगल्यामुळे चर्चेत आली आहे.

सुसज्ज बंगल्याचे वैशिष्ट्य

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील आलिशान बंगला हा हॉलिवूड गायिका जेनिफर लोपेझचा नवा पत्ता बनला आहे. ईशा आणि आनंद यांनी त्यांचा बंगला विकला आहे. जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यांनी हा बंगला 500 कोटींहून अधिक रुपयांना विकत घेतला आहे. या बंगल्यात अनेक सुविधा उपलब्ध आहेत. हा 38,000 चौरस फूट क्षेत्रफळात असलेला आलिशान बंगला होता, ज्यामध्ये 12 बेडरूम, 24 बाथरूम स्वतंत्र जिम, स्पा, सलून आणि इनडोअर बॅडमिंटन कोर्ट आशा अनेक सुविधांसह हा अतिशय सुंदर असा बंगला इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांनी जेनिफर लोपेझ यांना विकला.

जेनिफर लोपेझ यांच्या बद्दल

जेनिफर लोपेझ Jennifer Lopez या अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री असून त्यांनी 2022 मध्ये बेन ऍफ्लेकसोबत Ben Affleck लग्न केलं होतं. जेनिफर लोपेझ यांनी डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली आज त्या अंदाजे 3332 कोटी रुपयांच्या संपत्ती

मालक आहेत. निफर लोपेझ या अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री जेवढ्या अमेरिकेत प्रसिद्ध आहेत, तेवढ्याचं त्या भारतातही मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत.

ईशा अंबानीचा मुंबईतील बंगला:

आनंदच्या आई-वडिलांनी ईशा अंबानीला लग्नासाठी मुंबईत सी-फेसिंग बंगला भेट म्हणून दिला होता. हा बंगला राजवाड्यापेक्षा कमी नाही. त्याची किंमत करोडो रुपये आहे. हे विशेषतः 3D डायमंड थीममध्ये डिझाइन केले आहे. त्याचे नाव गुलिता. गुलिता खूपच प्रेक्षणीय आहे. हा अल्ट्रा लक्झरी बंगला सुमारे 50 हजार स्क्वेअर फूटवर आहे. त्याची किंमत सुमारे 500 कोटी रुपये आहे. पॅलेसमध्ये तीन तळघर, अनेक जेवणाच्या खोल्या आणि एक जलतरण तलाव आणि उंच छतासह एक मोठा हॉल देखील आहे.

Updated : 4 April 2024 11:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top