Home > Max Woman Blog > "८ मार्च"हा दिवस महिलांसाठी खास ,पण का ?

"८ मार्च"हा दिवस महिलांसाठी खास ,पण का ?

८ मार्चहा दिवस महिलांसाठी खास ,पण का ?
X

८ मार्च हा दिवस महिलांसाठी खास समजला जातो, पण का ? हा दिवस नक्की आहे काय ? या दिवसाचा इतिहास काय आहे ? किंवा महिला दिन साजरी करण्या मगचा काय उद्देश आहे जाणून घेऊयात मॅक्स वुमन वर..

१९०८ मध्ये १५,००० महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून मोर्चा काढला आणि सरकार विरोधात त्यांच्या मागण्यांमध्ये कामाचे तास कमी व्हावे, चांगले वेतन मिळावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा या साठी महिलानीं आंदोलन केले. सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने एका वर्ष नंतर पहिल्या राष्ट्रीय महिला दिनाची घोषणा केली. १९१० साली "क्लारा झेटकीन" या महिलेने जागतिक महिला दिन साजरी करण्याची संकल्पना पुढे आणली. या दिवसाची सुरुवात कामगार आंदोलनातून झाली.

"क्लारा झेटकीन" या महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आणि महिलांना सामान हक्क मिळावे अश्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांनी ही कल्पना सर्वप्रथम काम करणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या महिलांच्या परिषदेत कोपेनहेगनमध्ये 1910 साली मांडली होती.

त्या परिषदेत तब्बल १७ देशांमधून १०० महिला ऊपस्थित होत्या. त्या सर्व महिलांनी क्लारा यांची संकल्पना मान्य केली. १९११ साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला गेला. आता ८ मार्च लाच जागतिक महिला दिन का साजरी करतात म्हणजे ८ मार्च हीच तारीख का ?

या दिवसाची क्लाराच्या मनात कोणतीही ठराविक तारीख न्हवती परंतु 1917 मध्ये ८ मार्च या दिवशी निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या महायुद्धा दरम्यान रशियन महिलांनी संप केला. "ब्रेड अँड पीस" ही त्यांची मागणी होती. चार दिवसांनंतरच्या राजकीय परिस्थितीने रशियन त्झारला पदच्युत व्हावे लागले. तेव्हा स्थापन झालेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला होता. ज्युलियन कॅलेंडर तेव्हा रशियात वापरले जायचे ज्युलियन कॅलेंडर नुसार 23 फेब्रुवारी या दिवशी महिलांनी आंदोलन केले होते. आज आपण सगळीकडे वापरतो ते म्हणजेच ग्रेगोरियन कॅलेंडर त्यानुसार ही तारीख होती 7 मार्च हि तारीख होती. म्हणून ८ मार्च या तारखेला जागतिक महिला दिन म्हणून साजरी करतात.

आता या दिना निमित्त महिला जांभळे कपडे का परिधान करतात. त्या मागचा नक्की कारण काय आहे.. ? तर जांभळा रंग "न्याय आणि प्रतिष्ठा" दर्शवतो.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या वेबसाईट वर जरी गेलात तर तिथे जांभळा, हिरवा आणि पांढरा हे रंग हा या दिवसाचे प्रतीक म्हणून वापरले जातात. पांढरा रंग शुद्धतेचं प्रतीक आहे तर हिरवा रंग आशेचं प्रतीक आहे. यूकेतल्या महिला सामाजिक आणि राजकीय युनियनकडून हे रंग घेतले आहेत असे या वेबसाईट वर सांगितले आहे.

‘डीजी ऑल : संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी’ अशी महिला दिनासाठी संयुक्त राष्ट्रांची थीम आहे. या थीमचा उद्देश ज्या महिलांनी आणि मुलींनी जगभरात तंत्रज्ञान आणि ऑनलाइन शिक्षणात योगदान दिले आहे अशा महिला आणि मुलींना सन्मानित करणे. आणि डिजिटल लिंग असमानतेमुळे महिला आणि मुलींच्या आयुष्यावर नक्की काय परिणाम होतो, हे शोधणे या थीमच्या मागचा हेतू आहे.

तश्या तर यंदाच्या थीम अनेक आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वेबसाइटवर थीमच्या नावांचा उल्लेख आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की यावर्षी सन्मानित करण्यात येणाऱ्या काही थीममध्ये 'महिलांच्या जीवनात चांगले बदल घडवून आणण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे' आणि '‘महिलांबद्दल असलेल्या जुन्या विचारधारांना तोडणं, मुळात महिलांना कुठे तरी कमी लेखले जात आहे. असे ना करता त्यांच्या सर्वांगीण विकास कसा होईल हे पाहणे' अश्या अनेक थीमचा समावेश यंदाच्या महिलादिना निमित्त करण्यात येणार आहे.

Updated : 8 March 2023 4:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top