Home > Max Woman Blog > हैदराबाद एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह ?

हैदराबाद एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह ?

हैदराबाद एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह ?
X

#हैदराबादबलात्कार प्रकरणात ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. या घटनेनंतर देश भरातून आनंद कौतुक व्यक्त होत आहे आणि क्विकली व्यक्त होणं ही बरोबर आहे. पण या एन्काऊंटर ची दुसरी बाजू बघितली तर हैदराबाद पोलिसांनी आठ दिवसांत या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना ठार केलं.

काही प्रश्न निर्माण झाले?

या प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी खूप घाई करत हा निर्णय घेतला का? प्रकरणाची योग्य तपासणी झाली का? आरोपी जरी असले तरी त्यांचा गुन्हा सिद्ध झाला का? कायदा असा हातात घेणं बरोबर आहे का ? गुन्हेगारां ही आपल्याकडे स्वतःची बाजू मांडण्यासाठी वकील दिला जातो. पीडितेच्या आत्म्याला शांती मिळाली असेल अशी भावना जरी व्यक्त होत असली तरी कायद्या नुसार हा एन्काऊंटर खरंच बरोबर होता का ? असा प्रश्न शांत डोक्याने विचार केला तर नक्की पडेल. जो गुन्हा २८ नोव्हेंबर ला घडला त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला गेला. संसदेत ही खासदारांनी कठोर निर्णय घेतला जावा अशी मागणी केली गेली. त्या पिडितेवर विकृत मानसिकतेने केलेला अत्याचार हा नक्की च दुर्दैवी आहे मात्र गुन्हा घडल्यानंतर त्याची योग्य तपासणी योग्य ती शहानिशा करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतंय. #व्यक्तव्हा #encounter या प्रकरणाचा छडा इतक्या लवकर लागू शकतो तर देशात अनेक पीडित महिला मुली आहेत त्यांना न्याय देण्यात न्यायव्यवस्था आणि पोलिस प्रशासन इतकी दिरंगाई का करतात....

-प्रियंका आव्हाड

Updated : 6 Dec 2019 12:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top