Home > Max Woman Blog > नोकरी- व्यवसायात येणारा तणाव कसा कमी करावा?

नोकरी- व्यवसायात येणारा तणाव कसा कमी करावा?

नोकरी- व्यवसायात येणारा तणाव कसा कमी करावा?
X

गेल्या वर्षभरापासून प्रत्येकाच्या कामाची, जगण्याची पद्धत बदलली आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यानं त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे टेन्शन आणि कुटूंब कसं सांभाळावं? या जबाबदारीचा प्रचंड ताण आला आहे. टाळेबंदी मुळे अनेकांची काम वर्क फ्रॉम होम झाली आहे. यामुळे घरात कौटुंबिक हिंसाचार वाढला आहे. नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा, ताण निर्माण झाला आहे. या सगळ्या परिस्थिती ऑनलाईन दुनियेत लोकं जास्त रमू लागली आहे. त्यातही अधिक माहितीच्या भडिमारांमुळे तुम्हाला नेमकं काय करावं सुचत नाही का? नोकरी नसल्यामुळे तुम्ही तणावात आहात का?

कोविड काळात शारीरिक समस्यांसोबत मानसिक समस्याही दृढ झाल्याचं चित्र समाजात पाहायला मिळत आहे. अनेक जण नैराश्य, डिप्रेशन, उदासिनता, एकलकोंडेपणाच्या गर्तेत अडकले आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता नागरिकांच्या (लहानांपासून-वृद्धांपर्यंत) मानिसक आरोग्याची जनजागृती करण्याचा प्रयत्न मॅक्स महाराष्ट्र, मॅक्सवुमन आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने 'जनजागृती मानसिक आरोग्याची' या विशेष कार्यक्रमातून करणार आहोत.

नोकरी गेल्यामुळे आलेला तणाव कमी करण्यासाठी काय करावं? तणावात दिवसाचं नियोजन कसं करावं? घरात भांडण होऊ नये म्हणून काय करावे? यासंदर्भात मॅक्समहाराष्ट्रचे शिवाजी काळे यांनी मानसोपचारतज्ज्ञ तनुजा बाबरे यांची घेतलेली मुलाखत नक्की पाहा..


Updated : 22 Sep 2021 4:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top