Home > Max Woman Blog > गरोदर मातांनी बाळंतपणात कराव्यात या 5 गोष्टी

गरोदर मातांनी बाळंतपणात कराव्यात या 5 गोष्टी

गरोदर मातांनी बाळंतपणात कराव्यात या 5 गोष्टी
X

गरोदरपणात आईने आहाराची काळजी घेतली तर बाळ सुदृढ होते असं म्हणतात. त्यामुळे अनेक महिलांना गरोदरपणात सुदृढ बालकासाठी कोणता आहार घ्यावा? त्याचं प्रमाण किती असावं याची माहिती नसते. अशा मातांसाठी आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी मार्गदर्शन केलं आहे.

त्या म्हणाल्या की, "सुदृढ मातेच्या पोटी सुदृढ मुल जन्माला येतं. बाळाची प्रकृती आईच्या प्रकृतीवर अवलंबून असते. गरोदर , जन्मदा, आणि स्तनदा मातांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेणं आवश्यक असतं. माता पहिले शंभर दिवस काय आहार करते यावर तिच्या बाळची प्रकृती अवलंबून असते. बाळाला आईच्या दुधाची कमतरता भासता कामा नये. यासाठी मातेने अळीवाचे लाडू, मेथी खाणे अधिक फायदेशीर आहे. ज्या मातांना पाठीचं दुखणं आहे अशा मातांनी याचे प्रामुख्याने सेवन करावे. कारण यात कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि लोह यांचे प्रमाण अधिक असते."

पाहा काय म्हणाल्या ऋजुता दिवेकर...



Updated : 8 Oct 2020 10:17 AM GMT
Next Story
Share it
Top