Home > Max Woman Blog > स्त्रीयांनो आपापले शील जपा हं...!

स्त्रीयांनो आपापले शील जपा हं...!

स्त्रीयांनो आपापले शील जपा हं...!
X

धोनी चांगला खेळत नाहीये म्हणून धोनीच्या ४-५ वर्षांच्या मुलीला बलात्काराच्या धमक्या देतायत. धोनीचेच कधी काळचे फॅन्स..!! यावरून बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. पहिली गोष्ट म्हणजे भारतीय फॅन्सचा मेंदू गुडघ्यात किंवा घोट्यात असतो.. ( मी घाण लॅंग्वेज वापरत नाही, नाहीतर मेंदूची एक्झॅक्ट जागा सांगितली असती ) कोणत्याही क्षेत्रातला तुमचा फॉर्म टिकून असेस्तोपर्यंत तुमचे फॅन्स तुम्हांला डोक्यावर चढवून मिरवू शकतात. तुमचा फॉर्म गेला की, मग तुम्हांला माणूस म्हणून जगणे मुश्किल व्हावे या शब्दांत तुमच्यावर टीका होऊ शकते.

दुसरी गोष्ट, घरातल्या पुरूषावर मानसिक हल्ला करण्याची सोपी पध्दत म्हणजे त्याच्या घरातील स्त्रीवर शारीरीक अथवा मानसिक हल्ला करणे.. स्त्री 'खानदानकी, घरकी' इज्जत वगैरे असते नाही का..!! सगळ्या कुटुंबाची इभ्रत, मान ती तिच्या योनीत घेऊन जगत असते नाही का? आयुष्यभर!! त्या योनी पलिकडे तिचे अस्तित्व ते काय?

तिसरी गोष्ट बलात्कारासाठीचे शरीर स्त्रीचे नसले तरी आपल्या इथे चालते, ती फक्त मादी हवी. शरीराच्या सगळ्या गोलाकार भागांची पूर्ण वाढ झालेली नसली तरी चालत.. फक्त भोक महत्वाचे.. एनिवे आपल्या देशातून बलात्कार जात नसतो. आपल्या इकडच्या पुरूषांच्या डोक्यात वसतो बलात्कार. कधी स्पर्षाने, कधी डोळ्यांनी, कधी विचारांनी बलात्कार होतच राहतील..

स्त्रीयांनो आपापले शील जपा हं.. मन!? ते काय असत? मन थोडीच असते आपल्याला?? फक्त एक शरीर नाही का आपण??

(सई मनोज यांच्या फेसबुक भिंतीवरून)

Updated : 2020-10-13T07:15:52+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top