Home > Max Woman Blog > नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला मेरी स्कोल्डोवास्की

नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला मेरी स्कोल्डोवास्की

एक्स-रे सारखी प्रणाली किंवा कॅन्सरसारख्या रोगावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेडीयमचा शोध मेरी स्कोल्डोवास्की यांनी लावला आहे.

नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला मेरी स्कोल्डोवास्की
X

नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला, दोन वेळा नोबेल मिळवणारी पहिली शास्त्रज्ञ, दोन विषयांत नोबेलची पहिली मानकरी, पती-पत्नी दोघांनीही नोबेल मिळण्याचा पहिला प्रसंग... अशा विविध पहिलेपणाच्या विजेत्या थोर शास्त्रज्ञ मादाम मेरी क्युरी यांचा आज जन्मदिन. जन्माने पोलिश असलेल्या मेरी स्कोल्डोवास्की बहिणीसोबत शिक्षणासाठी पॅरिसला आल्या व पुढे फ्रेंचच बनल्या. त्यांचा विवाह पियर क्युरी या शास्त्रज्ञाशी झाला व दोघांनीही रसायनशास्त्र व पदार्थ विज्ञानात संशोधन सुरू केले. या दोन्ही विषयांतील संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाले.
रेडियमचा मानवी जीवनासाठी कसा उपयोग होऊ शकेल, या विषयी मादाम क्युरी यांनी केलेल्या शोधकार्याचे मानव जातीवर अनन्य उपकार आहेत. एक्स-रे सारखी प्रणाली किंवा कॅन्सरसारख्या रोगावर उपचार करण्यासाठी आजही रेडियमचाच उपयोग होतो. दैव दुर्विलास असा की, वयाच्या ६७ व्या वर्षी संशोधन करत असताना खिशात ठेवलेल्या टेस्ट ट्यूबमधील रेडियमच्या रेडिओ ॲक्टिव्हिटीचा प्रादुर्भाव होऊन ४ जुलै १९३४ रोजी त्यांना मृत्यू आला. मादाम क्युरी यांचे कायम स्मरणात ठेवावे असे हे विधान. त्यांचे जीवनसत्त्व व जीवनमंत्र यातून ध्वनीत होतो.ॉ
"Have no fear of perfection; you'll never reach it...Nothing in life is to be feared; it is only to be understood."

- भारतकुमार राऊत

Updated : 7 Nov 2020 6:46 AM GMT
Next Story
Share it
Top