Home > Max Woman Blog > father’s day: म्हणूनच माझा मला खूप आवडतो, Love you बाबा...

father’s day: म्हणूनच माझा मला खूप आवडतो, Love you बाबा...

father’s day: म्हणूनच माझा मला खूप आवडतो, Love you बाबा...
X

father’s day च्या निमित्ताने फिरत असलेल्या अनेक messages, father’s day special cinema, serials मधील काही वडीलांची पात्र आठवत आहेत.

अगदी The Croods आणि Onwards सारख्या animation film पासून तर Breath व दोनच दिवसांपूर्वी पाहीलेल्या आर्या या serial पर्यंत. या प्रत्येक गोष्टीत वडिलांची भूमिका वेगळी होती. त्या पात्राचं त्याच्या मुलांशी असलेलं नातं वेगळंच होतं. त्या सर्व गोष्टी काही पानांच्या, तासांच्या व कल्पना विश्वातील असतात. प्रत्यक्षात आयुष्य मात्र, बरंच मोठं असतं. आणि वेगळंही.

लहान असताना जवळपास सगळ्याच मुलांना त्यांचे आई - वडील आवडतात. कारण बहुतेक तरी सर्वच आई वडीलांनाही मुलं लहान असेपर्यंत आवडतातच. व त्या वेळेस ते एकमेकांना तेवढा वेळही देत असतात. पण हळूहळू मुलं मोठे होतात. त्यांना समजायला लागतं. त्यांचा इतरांशी संबंध यायला लागतो. त्यांच्या आवडी निवडी विकसीत होतात. ते स्वत:ला व्यक्त करायला शिकतात आणि मग ही नाती बदलायला लागतात.

काही अजून दृढ होतात तर काही मात्र दुरावली जातात. पण या सगळ्या सोबत हे होण्यामागे आणखीनही बरीच, आणि जवळपास सगळ्यांचीच वेगवेगळी, कारण असतातच.

पण तरीही, मी आज 37 वर्षांची झाली आहे. तरीही, मला, आम्हा सर्व भावंडांना व आमच्या सोबतच प्रकल्पातील व प्रकल्पा बाहेरीलही इतर अनेक मुला-मुलींनाही वेळ देणारा व त्यांनाही त्यांचा बाबाच वाटणारा, आम्हाला समजून घेणारा व प्रसंगी आमची समजूत काढणारा, अडचणींना संयमाने तोंड द्यायला सांगणारा, सरळ मार्गाने व आनंदाने आयुष्य जगता येत हे स्वतःच्या वागण्यातून शिकवणारा, आमच्यावर आजही तितकंच प्रेम करणारा, अगदी एखाद्या परी कथेतही शोभून दिसेल असा, आमचा बाबा मला खुप आवडतो.

Love you बाबा. Miss you बाबा.

Updated : 22 Jun 2020 8:24 AM GMT
Next Story
Share it
Top