Home > Max Woman Blog > "..तर फॅसिस्टांचा विजय ठरलेला आहे"

"..तर फॅसिस्टांचा विजय ठरलेला आहे"

..तर फॅसिस्टांचा विजय ठरलेला आहे
X

शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळतो आहे. पण लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या फॅशिस्ट सरकारला ते सारे फाट्यावर मारून स्वतःचीच लाल हे दाखवायचं आहे. देश एकजूट नसेल आणि प्रत्येक शेतकरी नेता आपापला नांगर सांभाळत बसणार असेल तर फॅशिस्टांचा विजय ठरलेला आहे. पंतप्रधान झुकणार नाहीत, ते मागे येणार नाहीत वगैरे बोलबाला ५६ इंची इमेज टिकवण्यासाठी केला जातो आहे. शेतकऱ्यांनी चर्चेस येण्यासाठी मान्य केले ही बातमी देताना माध्यमातले बंदे ही सूज बातमीला आणत आहेत.

एका पक्षाने आपल्या पक्षातील मेंढरी-खासदारांच्या पाशवी बहुमताच्या आधारे एकतर्फी कायदे संमत केले. लोकशाहीमध्ये एखाद्या कायद्याविरुद्ध एवढा मोठा जनक्षोभ असताना तो क्षोभ केवळ राजकीय विरोधकांच्या नावे रफादफा करण्याची बेशरमी केवळ हुकूमशाही फॅशिस्ट प्रवृत्तीतूनच दाखवता येते. तोंडाने पादण्याची सहासष्टावी कला यांनी चांगलीच विकसित केली आहे.

केवळ पंजाबी शीख शेतकरीच यात सामील आहेत असे सातत्याने दाखवले जात आहे. याला खलिस्तान वगैरे वळण देण्याची टिवटिव सुरू आहे. पण याच वेळी यांचे तथाकथित राजकीय विरोधक, जाणते वगैरे विरोधक आपले धोरणी मौन राखून आहेत. खरे म्हणजे वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो हे लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षांनी या आंदोलनाशी समरस व्हायला हवे. पण माती खायची हौस दांडगी.

या अभूतपूर्व शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळतो आहे. देशोदेशीचे विचारी भारतीय यासाठी पत्रके काढत आहेत. पण लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या फॅशिस्ट सरकारला ते सारे फाट्यावर मारून स्वतःचीच लाल हे दाखवायचं आहे.

देशभर एकजूट नसेल आणि प्रत्येक शेतकरी नेता आपापला नांगर सांभाळत बसणार असेल तर फॅशिस्टांचा विजय ठरलेला आहे. आणि त्यांच्या बुडाखालच्यांच्या मुठ्ठीत देश जाणार आहे.

मुग्धा कर्णीक

Updated : 29 Dec 2020 7:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top