Home > Max Woman Blog > माझ्या मृत्यूनंतर धार्मिक कार्य करु नये, 18 वर्षांपूर्वी आईने लिहिलं मुलांना पत्र

माझ्या मृत्यूनंतर धार्मिक कार्य करु नये, 18 वर्षांपूर्वी आईने लिहिलं मुलांना पत्र

मृत्यूनंतर धार्मिक कार्य करण्याची प्रथा-परंपरा आपल्या समाजात वर्षानुवर्षे पाहायला मिळतेय. मात्र या प्रथेला छेद देत एका आईने ‘माझ्या मृत्यूनंतर धार्मिक कार्य करु नका’ असं 18 वर्षांपूर्वी आपल्या मुलांना पत्र लिहिलं. ताराबाई राठी यांच्या जाण्यानंतर या पत्राविषयी त्यांच्या मुलांना काय वाटतेय ? जाणून घेण्यासाठी करा क्लिक वाचा क्विक

माझ्या मृत्यूनंतर धार्मिक कार्य करु नये, 18 वर्षांपूर्वी आईने लिहिलं मुलांना पत्र
X

सध्या देशात करोना महामारीची दुसरी लाट सुरु आहे. करोना विषाणू मानवजातीला दिवसेंदिवस नष्ट करत चाललाय. राज्यात करोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. या महामारीत अनेक जण मृत्यूमुखी पडतायेत. मृत्यू झाल्यानंतर धार्मिक कार्य, दशक्रिया, श्राद्ध, असं घालण्याची जी परंपरा, प्रथा समाजात आहे. त्या परंपरेला कुठेतरी छेद देण्याचं काम आता करोनाच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळतेय.

फेसबुकवर आशीष राठी नामक नेटिझन्सने एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्ट मध्ये आपली आई आपल्या सोडून गेली. त्याचबरोबर आईने आम्हा भावंडांना 18 वर्षांपूर्वी एक पत्र लिहून ठेवलं होतं. या पत्रात लिहिलेल्या सूचनांचं अवश्य पालन करावं असं आईने म्हटलं आहे. असं कॅप्शन देत त्या पत्राचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.
काय म्हटलं आहे पत्रात ?

प्रिय पुत्र सतेंद्र आणि आशीष,

मी या पत्राद्वारे तुम्हाला सुचित करु इच्छिते की, माझ्या मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी, ब्राम्हण भोजन, प्रती दिन,मोठा भोजन, होम, ग्यारवा, बारवा, तेरवा, याग, इत्यादी गोष्टी करू नये. मृत्यूच्या पश्चात अंतिम संस्कार एवढ्यापर्यंतचं शोक करा.तसेच माझ्या मृत्यूनंतर नेत्रदान, देहदान जे पण आवश्यक होत असेल ते करा. यात काही चूकीचं करु नका. तुमची आई ताराबाई राठी असं पत्र 17 एप्रिल 2003 साली त्यांनी आपल्या मुलांच्या नावे लिहून ठेवलं होत. समाजात आज ही मृत्यूनंतर धार्मिक कार्य करण्याची मोठी परंपरा, प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे. या प्रथेला न करण्याचा आणि आपल्या आईच्या विचारांवर चालणाऱ्या आशीष राठी यांच्याशी आम्ही बातचीत केली असता. आशीष राठी कोथरूड येथे स्थायिक असून त्यांचा रेडीमेट किड्स गारमेंट असा व्यवसाय आहे. ते सांगतात की,
आईला वाचनाची खूप आवड होती. आई पुरोगामी विचारांची असल्यामुळे आमचे विचारही आईसारखे आहेत. आईने कधीच कर्मकांडांना थारा दिला नाही. आईच्या लग्नानंतर आमच्या वडीलांचा सहा वर्षांनी मृत्यू झाला. गेल्या 47 वर्षांपासून आईने आम्हा भावंडांना एकट सांभाळलं. आमची आई-बाप तीच झाली. लहानपणापासून आम्ही आईची वाचनाची आवड बघत आलोय. आईमुळे आम्हालाही वाचनाची आवड निर्माण झाली. 27 तारखेला आईला अचानक ब्रेन स्ट्रोक, कार्डिअक अरेस्ट आला त्यानंतर आईला रुग्णालयात भर्ती केलं. मात्र आईने त्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला. आई जरी आमच्यात नसली तरी तिचे विचार आमच्यात आहेत.

Updated : 29 April 2021 8:24 AM GMT
Next Story
Share it
Top