Home > Max Woman Blog > बदलते बॉलिवूड

बदलते बॉलिवूड

महिला दिनानिमीत्त सर्वच क्षेत्रातील महिलांच्या स्थानांबद्दल तुम्ही पाहात अथवा वाचत असाल. याच निमीत्ताने बॉलिवूडमध्ये नेमकं काय घडतंय यावरसुध्दा नजर टाकणे गरजेचं आहे. एकेकाळी नेहमीच पीडित दाखवली जाणारी स्त्री आता योध्दा म्हणून जाखवली जात आहे. बॉलिवूडमध्ये होणारा हा बदल संथ गतिने होणारा असला तरी बॉलिवूड बदलतेय.. याच बदलत्या बॉलिवूडवर भाष्य केलंय प्रसिध्द अभिनेत्री दिपीका पदुकोण यांनी. वाचा त्यांच्याच शब्दात ‘बदलते बॉलिवूड’

बदलते बॉलिवूड
X

एकविसाव्या शतकात कुठला असा देश असेल जिथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं वारं, त्याचं महत्व पोहचलं नसेल! महिला दिनाचा उत्सव झालेला आहे. माझ्या दृष्टिकोनातून प्रत्येक दिवस हा महिला दिन आहे.. कारण पुरुष वजा स्त्री काहीही उरत नाही.

माझ्या घरात आम्ही ३ स्त्रिया. मी, आई आणि धाकटी बहीण अनिशा. घरातील बहुतेक निर्णय घेण्याचं स्वातंत्र आई (उज्वला पदुकोण)लाच होतं. सध्याच्या काळात महिलांना विशेष महत्व मिळतय. त्यामुळे, अगदी आऊट ऑफ द वे जाऊन महिला दिन साजरा करण्याची खास वेगळी गरज आहे, असं मला वाटत नाही. महिला दिन साजरा करण्याची प्रथा तेंव्हा प्रकर्षाने सुरु झाली जेंव्हा महिलांना अधिक किंवा खास अधिकार देण्याची गरज आहे. असं चित्र निर्माण झालं होतं..

आमच्या कुटुंबात स्त्री -पुरुष एक समान -एका पातळीवर आहेत असंच आरंभापासून मानलं जातंय. महिलांना सम्मान द्या, त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी महिला दिन किंवा नवरात्रीची गरज नसावी!

माझ्या जन्मापासून मी माझ्या वडिलांना बॅडमिंटन खेळताना पाहिलंय, त्यांची मुलगी म्हणून आणि त्यांनी मला बॅडमिंटनचे कोचिंग दिल्यामुळे मी दर्जेदार बॅडमिंटन खेळू लागले. मी त्यांच्याप्रमाणे उत्कृष्ट बॅडमिंटन प्लेयर होईन असं त्यांना वाटत असताना मी अभिनयाकडे वळले हे सगळ्यांसाठी अनपेक्षित होतं! पण तरीही जराही विचलित न होता त्यांनी मला अभिनयासाठी देखील पाठिंबा दिला..

कारकिर्दीच्या एका टप्प्यावर मला डिप्रेशनने घेरलं.. फार अवघड काळ होता तो, त्याही आणिबाणी प्रसंगी माझे कुटुंबीय माझ्या सोबत होते, त्यांनी मला सावरलं नसतं तर मला माझी कल्पना करता आली नसती! सांगायचं तात्पर्य हेच की स्त्रीला तिच्या कुटुंबाची -विवाहानंतर पती आणि सासरच्या कुटुंबाची त्यांच्या धीराची गरज असते.

स्त्री मुळातच मल्टी टास्किंग आहे. तिच्या मानसिक क्षमतांवर संदेह करू नये. स्त्रिया प्रबळ आहेत आणि असतातच. अलीकडच्या काही वर्षांतील बॉलिवूड चित्रपटांतील नायिका पहा म्हणजे लक्षात येईल की हल्ली नायिकांचे पारंपारिक रूप बदलले आहे. आताच्या नायिका आधुनिक आहेत, त्यांचे विचार प्रगत आहेत, आपले विचार मांडण्याची क्षमता आहे. हिम्मत आहे. सशक्त स्त्री दाखवताना तिच्या हातात तलवार असण्याची आवश्यकता नसते.. मी ३-४ वर्षांपूर्वी केलेल्या 'पद्मावत'मधील राणी पद्मावतीला तलवार घेऊन रणांगणावर लढताना एकदाही दाखवलेलं नाही. वेळ प्रसंगी स्त्रीची मानसिक हिम्मत आणि शब्द इतरांसाठी प्रहार बनले पाहिजेत.

त्यानंतर माझ्या ''छपाक' फिल्मची नायिका ही देखील ऍसिड हल्ल्यांनंतर जीवनाला निर्भयतेने सामोरी जाते.. माझे अन्य चित्रपट पहा पिकू, कॉकटेल, लव्ह आज कल ह्या सगळ्या नायिका आजच्या स्त्रीचे प्रतिनिधित्व करता.. त्या रेलेव्हंट आहेत. पडद्यावर दिसणारी नायिका तिच्या प्रत्यक्ष जीवनात विवाहित आहे अथवा नाही याचा प्रेक्षक आता विचार करत नाही आणि म्हणूनच विवाहित अभिनेत्रींची कारकीर्द त्यांच्या लग्नानंतर आणि हो मातृत्वानंतरही खंडित होत नाही. हा आजचा बॉलिवूडमधील आल्हाद दायक बदल आहे.

आजच्या स्त्रीला अचूक माहित आहे की तिला तिच्या आयुष्यापासून काय हवंय.. गरज आहे ती त्यांचे मनोबल वाढवण्याची, त्यांना समर्थन देण्याची! सकारात्मक प्रवृत्तीने स्त्रीला साथ द्यायची..

स्त्रियांना वर्तमानात जगायचं आहे .. तोच उद्याचा भविष्य काळ असेल जो सुखद असावा..

- दिपीका पदुकोण, अभिनेत्री

Updated : 7 March 2021 3:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top