Home > Max Woman Blog > #FriendshipDay : मित्र दिवस किंवा मैत्र दिवस !!

#FriendshipDay : मित्र दिवस किंवा मैत्र दिवस !!

मैत्रीचं नातं काय असतं? या नात्यात बिघाड झाला तर काय करायला हवं? याविषयी फ्रेन्डशीप डे च्या निमीत्ताने आनंत शितोळे यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत...

#FriendshipDay : मित्र दिवस किंवा मैत्र दिवस !!
X

मित्र माझ्यासाठी लिंगभेदापलीकडे असलेली एक व्यक्ती आहे, मित्र म्हटल्यावर उगाच वेगळं काहीतरी लेबलिंग करण्याचा अट्टाहास मला अनाठायी वाटतो.

रक्ताचे नातेवाईक, कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी निवडण्याच स्वातंत्र्य आपल्याला नसत मात्र मैत्री हे नातं ती मुभा आपल्याला नक्कीच देत.

ज्या मित्रांनी आयुष्य समृद्ध केलय त्यांच्यासाठी.

काय असत नक्की मैत्रीच नात ?

आपण वाचतो आणि सोडून देतो " मैत्री रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेठ असते "

आपण एकत्र का येतो ?

कुठेतरी मन जुळली विचार जुळले म्हणून , पण हाताची पाची बोट सारखी नसतात तशीच एका आई बापाची दोन पोरपण सारखी नसतात ..

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा , घरची , शैक्षणिक स्थिती वेगळी , सगळ वेगळ पण तरीही एकत्र येतो.

गरजेच आहे आपल्या सगळ्या आवडी निवडी जुळण ? आणि का जुळाव्यात ? जर सगळ सारख असेल तर आपण फक्त झेरॉक्स बनून राहू एकमेकांच्या ..

आपआपली स्वभाव वैशिष्ट्य सांभाळून आपण एकत्र येण यालाच मैत्री म्हणतात.

एकत्र येऊनही आपापल वेगळेपण जपण आणि वेगवेगळे असताना एकजीव होण यालाच मैत्री म्हणतात.

राजकीय सामाजिक आर्थिक सगळ्या बाबींवर मत वेगळी असतील तर असू देत ना ..

तरीही आपण एक असतो , एका समान धाग्यान ,, माणुसकीच्या

कुठही वेदना करुणा दुखः दिसलं तर आपल्या काळजात सल येते आपण हळहळतो .. कुठल्याही माणसाला मदत करायला तयार होतो ..

पण कधीतरी काहीतरी बिघडत

आपण वेगवेगळे आहोत हे समजून घेत नाही , प्रत्येकाने माझ्या मनाप्रमाणे वागाव अशी का अपेक्षा करतो ?

कुणीतरी माझ्या मनासारखं वागाव ह्यापेक्षा मी त्याच्या मनासारखं का वागत नाही ?

मला कुणीतरी समजून घ्याव ह्या पेक्षा मी कुणाला तरी का समजून घेत नाही ?

आपला अहंकार वेगळा आणि स्वाभिमान वेगळा

आणि मैत्रीत कसला आलंय अहंकार ? मैत्रीत येताना मित्रात येताना सगळ्या प्रकारचे जोडे बाहेर काढून मग आत यायचं असत

आपली नख वाढली तर आपण काय करतो ? नख कापतो कि बोट कापतो ?

मग इथ आपण का बोट कापायला निघालोय ? का नख कापून प्रश्न सोडवत नाही ?

कुठली गोष्ट किती काळ धरून ठेवायची आणि किती ताणायची हेही शिकायला पाहिजे.

समजा माझ्या मित्राने माझ्यावर , माझ्या शारीरिक गोष्टीवर विनोद केला तर मी काय करायला पाहिजे ?

कुणी म्हणेल मी पण त्याच व्यंग शोधून त्यावर विनोद करेल.

मी म्हणतो , माझ्या मित्राला माझा विनोद करायला का होईना उपयोग झालाय ह्या पेक्षा अजून माझ भाग्य काय ?

अस जर मोकळ वागल नाही तर काय होत ?

कळत नकळतपणे मग आपल्या मनातले पीळ दिवसेंदिवस घट्ट होत जातात ..

आपण विनाकारण ह्या सगळ्या अनावश्यक गोष्टींचे बोजे आपल्या मनावर घेऊन ओझे वाहणारी गाढव बनतो.

आणि हे बदलता येत नाही अस कोण म्हणत ?

ह्या जगात चिरंतन स्थायी अस काहीच नसत .. टिकणारी फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे बदल.

मी ठरवलं तर मी आजही बदलू शकतो

आता बदलायला हव , वाढत्या वयाबरोबर अधिकाधिक मोकळ होऊन दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे .. आणि मी का सुरुवात करू ? असा प्रश्न येत असेल तर अस विचारून पहा मनाला कि मी का नाही सुरुवात करणार ?

माझे मित्र आहेत त्यांच्यासाठी काही पण कधी पण ..

मैत्रीला कुठलही मूल्य नसत तर आपल्या जीवनाला आपली मैत्री अमुल्य करते..

कारण मी मित्र महत्वाचे मानतो ..

विचार करून पहा .. प्रयत्न करून पहा .. कुणी कस वागाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी कस वागाव हा माझा प्रश्न आहे ..

मी त्याला समजून घेईल , मी माझा असलेला नसलेला अहंकार बाजूला ठेवील अस प्रत्येकाने ठरवलं तर पुन्हा सगळ सुरळीत होईल .

आणि सुरुवात कुणी करायची असा प्रश्न असेल तर मी सुरुवात करीन ..

मनातली किल्मिष , काजळी झटकून ,, सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवून आणि मोकळ्या मनाने एकमेकांना समजून घेतल.

मनातल बोला पण मन मोडतील अस बोलू नका ..

मतभेद जरूर असावेत , ते माणसाच्या जिवंतपणाच लक्षण आहे पण मनभेद नकोत आणि मित्रात तर नकोच नको .

आपल्या कुणी जशी वागणूक द्यावी अस वाटत तशीच वागणूक आपल्या मित्राला द्या ..

आयुष्य खूप सुंदर आहे त्यात मैत्रीसारख सुंदर दुसर काहीही नाही .. खूप नशीबवान लोकांना चांगले मित्र मिळतात म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.

आनंद_शितोळे

Updated : 7 Aug 2022 6:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top