Home > Max Woman Blog > अँजेला मर्केल: जनमताचा कानोसा घेणारी नेता...

अँजेला मर्केल: जनमताचा कानोसा घेणारी नेता...

जगभरात अनेक नेत्यांना लोक मोठ्या मतांनी निवडूण देतानाची अनेत उदाहरण पाहिली. मात्र, हे नेते जनमताचा कानोसा घेऊन राज्यकारभार करतात का? त्याचे काय परिणाम देशातील जनतेला भोगावे लागतात? याचा ते विचार करतात का? वाचा जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्याबाबत डॉ सुभाष देसाई यांनी केलेले विश्लेषण...

अँजेला मर्केल: जनमताचा कानोसा घेणारी नेता...
X

जर्मन राष्ट्राची सर्वेसर्वा म्हणजेच चॅन्सेलर अँजेला मर्केल निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेली पोकळी केवळ जर्मन राष्ट्राला नव्हे साऱ्या युरोपला भरून काढणे एवढे सोपे जाणार नाही. त्याची कारणेही तशीच आहेत आणि त्याची व्यापकता ही मोठी आहे. माजी अमेरिकन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी म्हटले आहे की सारे जग यांच्याबद्दल कृतज्ञ आहे अतिशय दृढ विचाराच्या, संवेदनक्षम आणि उच्च दर्जाची नैतिक मूल्ये बाळगणाऱ्या आहेत.

जागतिक राजकीय पटलावरील अत्यंत सामर्थ्यशील नेत्यावर प्रभाव टाकणाऱ्या या महिलेमुळेच सत्तासंघर्ष पेटला नाही. डोनाल्ड ट्रम्प आणि ब्लादिमीर पुतीन यांच्यात सत्ता समतोल राखण्याचे अजब कौशल्य त्यांच्याकडे होते. त्या नसत्या तर जग तिसऱ्या महायुद्धाचा कडे झुकले असते.

दोन बलाढ्य शत्रूंना फार कुशलतेने आणि व्यावहारिक दृष्ट्या त्यांनी हाताळले. युरोपला ट्रम्प च्या बेताल निर्णयामुळे धोका निर्माण झाला असता म्हणून बराक ओबामा यांनी मर्केल यांना दुसऱ्यांदा जर्मनीच्या चान्सलर बनण्याचा सल्ला दिला होता पण मरकेल बाईंचा स्वभाव थोडा इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच होता म्हणजे न हलणारा. आयफेल टॉवर म्हणाना!

मर्केल यांची ख्याती होती की, त्या निर्णय लांबणीवर टाकत असत. जनमताचा कानोसा प्रथम घेत. भारताचे पंतप्रधान नरसिंहराव एकदा म्हणाले होते निर्णय न घेणे हाच निर्णय असतो .

वृत्तपत्र टीव्ही च्या बातम्या, चर्चेत आणि वाद विवादात त्या कधी भाग घेत नसत. विरोधकांच्या मतांचा अभ्यास करीत. जनमत अजमावत आणि मग निर्णय घेत. युरोपियन युनियन व जी सेवन मध्ये त्यांनी अनेक तडजोडी केल्या. मायदेशात चार वेळा समविचारी मंडळींचे सरकार बनवले. अनेक वेळा कड्याच्या टोकावर त्यांचे सरकार गेले होते पण ते कधीच कोसळले नाही.

युरोपियन युनियनचे अध्यक्ष मायकेल एकदा म्हणाले अँजेला मर्केल जर शिखर परिषदेत गैर हजर राहतील तर व्हॅटिकन शिवाय रोम आणि आयफेल टॉवर शिवाय पॅरिस अशी स्थिती उद्भवेल. एके वेळी पूर्व जर्मनीच्या पोलादी भिंतीत वाढलेल्या या मुलीने ही भिंत तोडली आणि जर्मनीला जगात सन्मानाचे स्थान मिळवून दिले.

विरोधकांनी विरोध करताना त्यांना हिटलरच्या रूपात चित्रित केले पण ती डगमगली नाही. युरोपियन युनियनला कोरोना महामारीत आठशे कोटी डॉलरचा फंड उभा करून आर्थिक क्रांतीच करून दाखवली. आज 67 वर्षांच्या अँजेला मार्केल या जगातील अत्यंत विश्वास राजकीय नेतृत्व ठरले आहे. मध्यंतरी रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याला त्यांनी पाठिंबा दिला पण रशियन गॅस जर्मनीला पुरवण्याच्या योजनेला संपूर्ण सहकार्य केले.

चीनने मानवी हक्क जोपासले पाहिजेत हे सांगताना चीनला युरोपियन युनियन मध्ये पैसे गुंतवायला ही त्यांनी भाग पाडले.

त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सर्वात कठीण प्रसंग म्हणजे दहा लाख निर्वासित त्यांनी स्वीकारले त्यावरून मोठ्या विरोधाला त्यांना सामोरे जावे लागले होते. दुसरा कठीण प्रसंग म्हणजे ऊर्जेसाठी जर्मनीने कोळसा वापरला. त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर टीकेची झोड उठली होती. पण त्या एका नैतिक विचारावर ठाम उभ्या होत्या. म्हणजे जर्मनी जगला पाहिजे .

या साऱ्या राजकीय पटलावर खेळताना त्या व्यक्तिगत जीवनातही प्रामाणिक राहिल्या. बर्लिनमध्ये एका छोट्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहतात. देशाचा प्रमुख किराणा मालाच्या दुकानात जाऊन खरेदी करतो अगदी सर्वसामान्य जर्मन नागरिक या सारख्या वागतात. हे त्यांचे वैशिष्ट्य. त्या स्वतः उत्तम स्वयंपाकही करतात. जीवनात छोटी पावले त्या टाकतात मोठ्या उड्या मारीत नाहीत. त्यातून गुंतागुंतीचे प्रश्न सोडवतात.

शक्यता आणि आपल्या मर्यादा याकडे त्यांचे लक्ष असते. एक गोष्ट खरी की केवळ जर्मन नागरिकच नव्हे तर सारे जग अँजेला मर्केल ला पुढे कित्येक वर्षे विसरू शकणार नाही. भारतातल्या नव्या पिढीतील राजकीय नेत्यांनी अँजेला मर्केल यांचे व्यक्तिगत आणि राजकीय जीवन अभ्यासावे. त्याचा त्यांना भवितव्यात मोठा फायदा होईल असे माझे मत आहे.

डॉ. सुभाष देसाई कोल्हापूर

Updated : 24 Nov 2021 7:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top