Home > Max Woman Blog > आई तुला नाही का गं आम्हाला मारून टाकावसं वाटलं?

आई तुला नाही का गं आम्हाला मारून टाकावसं वाटलं?

आई तुला नाही का गं आम्हाला मारून टाकावसं वाटलं?
X

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे प्रेमविवाहामुळे मुलीच्या आईनेच मुलाला हाताशी घेऊन तीचा खून केल्याची घटना घडली होती. यावर स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत देवकीचं काम करणाऱ्या मिनाक्षी राठोडनं तिच्या आईला एक पत्र लिहीलंय. या पत्रातून तिने प्रेमविवाहाचा तसेच आंतरजातीय लग्नांचा राग बाळगणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या भावना लिहील्या आहेत. नेमकं काय म्हणाली आहे मिनाक्षी वाचा हे पत्र....


आई...

1)मोठ्या ताईचं intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला तुला. मी पाहिलंय. किती राग आला असेल न तुला ताई चा.


2) माझं कैलाश सोबत intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी जवळ जवळ तुला त्यांच्यात गृहीत धरणं सोडलं होतं. किती किती राग आला असेल तुला माझा!

पण कायम उसाचे पाचड अंगाखांद्यावर बाळगणारा तांडा आणि पुढारल्या पणाचे सोंग मिरवणारी आपली शहरातली कॉलनीही तुझ्या एका स्वीकाराने तुझ्या सोबत ऊभी राहीली!


3) काल परवा आपल्या लहान मुलीचं ही intercaste लग्नं मोठ्या थाटात लावून दिलस. आणि सगळ्यांनाच जणू हीच कशी नवीन जन रीत आहे हे सांगून दिलेस! हे स्विकाराचंं बीज तुला कुठे गवसलं?

आपल्याला 5 मुली असतांना सुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलस.! राग कसा ग control केलास? ते ही पप्पा नसतांना ,तुला नाई का ग आम्हाला मारून टाकावस वाटलं?


हे असच "कीर्ती थोरे "च्या आईला का नाई वाटलं एवढं राग अनावर होत असतो का प्रतिष्ठे पाई? तिने तर जातितच लग्न केले होते. तुझ्या एवढं नाई फक्त एकाच मुलीला स्वीकारायचं होते तिला. पोटच्या मुलीचा इतक्या अमानुषपणे खून करावसं वाटणं या पेक्षा क्रूर काय असू शकतं या जगात. काश माझ्या सारखी आई कीर्ती ला लाभली असती तर? आणि हो! स्वप्निल शुभम सारखे भाऊ ही!

या बेगडी प्रतिष्ठेच्या बंजर जमिनीवर तुझ्या स्विकाराचंं बियाणं सापडूदे आई!

काल परवाच सकारात्म वाटणारी तुझ्या वाढदिवशी लिहिलेली ही पोस्ट, आज ही घटना एकूण अस्वस्थ करणारी आहे.

सगळ्या चिंता, रुढी परंपरांना झुगारून हा जो swag तू स्वीकारला आहेस याने तुझ्या लेकरांची आयुष्य सुखी झाले आहेत. तुझ्यातल्या या सकारात्मक बदलाने आजूबाजूची परिस्थिती कुस बदलतेय! हा swag खर्या अर्थाने तुलाच शोभून दिसतो! जो प्रत्येक स्त्री मधे येवो!

(वरचा फोटो कीर्ती आणि अविनाश चा आहे)

Updated : 11 Dec 2021 1:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top