Home > Max Woman Talk > लाली, पावडर लावणाऱ्यांचं काम नाही म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थट्टा उडवली..

लाली, पावडर लावणाऱ्यांचं काम नाही म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थट्टा उडवली..

लाली, पावडर लावणाऱ्यांचं काम नाही म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थट्टा उडवली..
X

शीला डावरे या महिलेचा संघर्ष फार मोठा आहे. भारतातील पहिली महिला रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्यांची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. खरंतर ही अत्यंत कौतुकाची गोष्ट असताना समाजाने, कुटुंबाने हि महिला पुरुषी काम करते म्हणून त्यांना मोठा त्रास दिला. ज्यावेळी त्यांनी रिक्षाचालक होण्याचं ठरवलं त्यावेळी महिलांना रिक्षा मिळणे महाकठीण होतं. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी रिक्षा मिळवण्यासाठी या महिलेचा संघर्ष सुरू झाला आणि या संघर्षातून ती राहुल बजाज यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली. इतकच नाही तर स्पेशल कोर्टात जाऊन रिक्षा देखील मिळवली. रिक्षा मिळाली पण परमिट साठी पुन्हा शासनाबरोबर लढाई सुरू झाली.

RTO अधिकाऱ्यांनी तर थेट हे लाली पावडर लावणाऱ्यांचं हे काम नाही म्हणून त्यांची थट्टा उडवली. तुम्हाला दाढी-मिशी नाही म्हणून तुम्हाला रिक्षाचं परमिट मिळणार नाही अशी थट्टा करत अधिकाऱ्यांनी त्यांना सुनावलं. पण त्यांनी लढायचं ठरवलं होतं. त्या लढाई लढल्या व प्रशासनाला त्या गुरमिष्ठ अधिकाऱ्यांना झुकाव लागलं आणि त्यांनी रिक्षाचे परमिट मिळवलं. यानंतर अनेकांनी त्यांचा मानसन्मान देखील केला. एका अर्थाने त्यांची लढाई संपली होती. व्यवसायाला सुरुवात झाली पण ही लढाई संपल्यानंतर त्यांना दुसरी लढाई त्यांच्या नवऱ्यासोबत करावी लागली. नवऱ्याने तिला व तिच्या मुलीला वाऱ्यावर सोडलं. या सगळ्या लढाईत या माउलीला साथ देण्यासाठी त्यांची मुलगी खंबीरपणे उभी होती. परस्त्री सोबत आपल्या वडिलांना रंगेहात पकडत आपल्या आईची फसवणूक करणाऱ्या वडिलांचा खरा चेहरा तिने जगासमोर आणला. हा संपूर्ण प्रकार अंगावर शहारे उभा करणार आहे. या माय-लेकरांचा हा संगर्ष आजही सुरु आहे..


Updated : 29 Jun 2023 8:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top