Home > Max Woman Talk > सावित्रीचा वारसा : मी अनिष्ट प्रथा-परंपरा नाही फक्त बाबासाहेबांचा कायदा मानते

सावित्रीचा वारसा : मी अनिष्ट प्रथा-परंपरा नाही फक्त बाबासाहेबांचा कायदा मानते

सावित्रीचा वारसा : मी अनिष्ट प्रथा-परंपरा नाही फक्त बाबासाहेबांचा कायदा मानते रुपाली चाकणकर गरजल्या

सावित्रीचा वारसा : मी अनिष्ट प्रथा-परंपरा नाही फक्त बाबासाहेबांचा कायदा मानते
X

पुणे - अनिष्ट प्रथा-परंपरांच्या विरोधात लढण्याचं बळ मला सावित्रीमाईंनी दिलंय त्यामुळे माझ्यावर होणाऱ्या टिकेला मी घाबरत नाही, मी अनिष्ट प्रथा-परंपरा मानत नाही, मी फक्त बाबासाहेबांचं संविधान मानते, असं म्हणत हळदी-कुंकू कार्यक्रमांना विधवा महिलांच्या हजेरीवरून सुरू असलेल्या वादाचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे. महिला आयोगाच्या तीस वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेत असताना महिलांच्या आर्थिक सबलीकरणाचा मुद्दा आपल्या प्राधान्यक्रमावर असल्याचं त्यांनी सांगीतलं. मानवी तस्करी, बालविवाह यांच्या विरोधात रूपाली चाकणकर यांनी उघडलेल्या मोहीमेचा आढावा घेण्यासाठी मॅक्सवुमन च्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांनी महिला आयोग आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याशी खास बातचित केली.

महिला आयोगाच्या तीस वर्षाच्या प्रवासात महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न केले, या प्रयत्नांना रूपाली चाकणकर यांनी मोहीमेचं स्वरूप देऊन अख्खा महाराष्ट्र पालथा घातला. राज्यभर दौरे, महिला मेळावे आणि पिडीत महिलांशी चर्चा करून रूपाली चाकणकर यांनी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम राबवला आहे. तृतीय पंथीयांसाठी वैद्यकीय सुविधांचा प्रश्न असो, एकल महिलाचे प्रश्न असोत, विधवा महिलांना मान-सन्मान देण्याचा मुद्दा असो, रूपाली चाकणकर यांनी चतुःरस्त्र व्यक्तिमत्वाचा परिचय देत अनेक उपक्रम राबवले आहेत. ‘महिला आयोगाच्या आपल्या कार्यकालात मला समाधानकारक काम करता आलं, कुटुंबव्यवस्था टिकण्याबरोबरच महिलांचा सन्मान आणि आत्मविश्वास टिकावा म्हणून मी काम केलंय याकाळात विधवांना सन्मान मिळावा म्हणून हळदी-कुंकू समारंभांमध्ये सामील करण्याचा उपक्रम सुरू केला होता. आता या उपक्रमाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी अनिष्ट प्रथा-परंपरांच्या विरोधात आहे, त्यामुळे मी टिकेला घाबरत नाही, मी बाबासाहेबांचं संविधानाला मानते, आणि त्यांचा कायदा ओळखते,’ अशी स्पष्टोक्ती ही रूपाली चाकणकर यांनी केली.

हळदी-कुंकूच्या कार्यक्रमांना विधवा महिलांना बोलवणार असाल तरच कार्यक्रमांना येईन अशी अट मी ठेवते. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली आहे. महिलांसाठी हिऱ्या-मोत्याच्या दागिण्यापेक्षा कुंकवाचं महत्व फार आहे. हा भावनात्मक मुद्दा आहे. हा महिलांच्या सन्मानाचा मुद्दा आहे, असं ही रूपाली चाकणकर यांनी प्रियदर्शिनी हिंगे यांच्याशी बातचित करताना सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी ही अजित दादांना समर्थन देण्याची भूमिका घेतली. याबाबत विचारणा केली असता रूपाली चाकणकर यांनी आपल्या मनात शरद पवार यांच्याबद्दल आदर असल्याचं सांगितलं, मात्र अजित पवार यांनी सदैव आपल्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतल्याने आमचं कुटुंब अजित दादांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. अजित पवार यांचे महिलांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अतिशय स्वयंस्पष्ट असून जिल्हा नियोजन मंडळांच्या बैठकीत महिलांचा अत्यल्प सहभागाची बाब निदर्शनास आणून देताच अजित दादांनी सहभाग कसा वाढेल याच्या सूचनाच दिल्या ही बाब ही चाकणकर यांनी आवर्जून सांगितली. परिस्थितीनुरूप अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयासोबत आपण आहोत असं ही चाकणकर यांनी मॅक्सवुमन ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं आहे.

ही संपूर्ण मुलाखत तुम्ही मॅक्सवुमन पोर्टल, तसेच फेसबुक-युट्यूब चॅनेलवर पाहू शकता.

I know Dr Ambedkars constitution only will be with Ajit Pawar led party Rupali Chakankar special interview

https://youtu.be/FI9RyFuboY0?si=fIBl-dCgA1CEgc5G

https://fb.watch/p-rDQoE-1x/

Updated : 5 Feb 2024 8:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top