Home > Max Woman Talk > सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतले बलात्कारी

सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतले बलात्कारी

एका फेसबूक गृपवर सदस्य स्त्रीने ‘ पिरेडस् जवळ यायला लागले की सेक्शुअल फिलींग्स जास्त येतात ‘ या रिलेटेड मिम टाकला होता. त्यावर ‘काही’ मुलांनी अत्यंत घाणेरड्या प्रतिक्रिया केल्या होत्या. ‘ मग ये ना’, ‘ मी आहे ना’ वगैरे वगैरे.. जणू काय त्या स्त्रीने व्यक्त होऊन मोठी चूकच केलीय. स्त्रीच्या लैगिक गरजा, त्यातले प्रश्न यावर उघडपणे बोलणे जणू काही पापच असावे मोठे..

सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतले बलात्कारी
X

आपल्या समाजात स्त्री पुरूष भेदभाव सर्व ठिकाणी, सर्रास आढळतो. मग सोशल मिडिया तरी याला अपवाद कसा ठरेल? पुरूषांचे बिनधास्त व्यक्त होणे सोशल मिडियावर अगदी सहजतेने स्विकारले जाते. पण स्त्रीच्या तोंडून एखादा असा तसा, म्हणजेच समाजात चार चौघात बोलू शकत नसलेला विषय पोस्टच्या रूपाने बाहेर पडला तर मात्र गदारोळ होतो. त्या स्त्रीला गलिच्छ प्रतिक्रियांना तोंड द्याव लागत, तिचं चारित्र्यहनन होत.

फेसबुकवरील एका मिमर गृपवर काही दिवसांपूर्वी असाच एक किस्सा घडलेला. गृपच्या एका सदस्य स्त्रीने ' पिरेडस् जवळ यायला लागले की सेक्शुअल फिलींग्स जास्त येतात ' या रिलेटेड मिम टाकला होता. त्यावर 'काही' मुलांनी अत्यंत घाणेरड्या प्रतिक्रिया केल्या होत्या. ' मग ये ना', ' मी आहे ना' वगैरे वगैरे.. जणू काय त्या स्त्रीने व्यक्त होऊन मोठी चूकच केलीय. स्त्रीच्या लैगिक गरजा, त्यातले प्रश्न यावर उघडपणे बोलणे जणू काही पापच असावे मोठे..

आत्ता कुठे स्त्रीयांना स्वत:ची वाचा मिळालीय. त्या बोलायला लागल्या आहेत. आपली मत ठामपणे मांडत आहेत. तर अशावेळी वास्तव जगात असूदे किंवा आभासी जगात, मुली मोकळेपणाने बोलतात तर बोलूदेत की. स्त्रीयांच्या अशा पोस्ट तुम्हांला स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी म्हणून नसतात पुरूषांनो. मनाच्या व्याप्ती वाढवून स्त्रीला समजून घेतले पाहिजे तुम्ही. तो खरा पुरूषार्थ, नाही का!!

आणि अशा कमेंटस करून तुम्ही काही ' कूल' दिसत नाही बरं का, उलट आभासी जगातले बलात्कारी मात्र वाटता..

स्त्रीयांच्या बिनधास्त पोस्टवर घाण घाण प्रतिक्रिया करणारे हेच पुरूष, कुठे बलात्कार झाला की मात्र मोठ्या मोठ्या पोस्ट लिहितात. मारे तावातावाने बोलतात. पण एखाद्या स्त्रीबद्दल गलिच्छ शब्द वापरून आपण तिच्या मनाची लक्तरे काढून , तिच्यावर मानसिक बलात्कार केलाय हे मात्र सोयीस्कररित्या विसरतात..

आजच' माझा बाबू माझ्याशी बोलत नाही ' अशा एका पोस्टवरच्या अश्लिल प्रतिक्रिया पाहून आठवला मला त्या मिमर गृपवरचा किस्सा.. स्त्री मोकळेपणाने बोलली की ती मला सिग्नल देतेय, स्त्रीने स्वत:चे फोटो अपलोड केले की ती पुरूषांना भुलवतेय, मोकळेपणाने चॅट केले की हि तर अव्हायलेबलच आहे, अशा गैरसमजात का असतात ' काही ' पुरूष? स्त्रीच्या आयुष्याचा सेंटर पाॅईंट समजू नका स्वत:ला..

मुलींच्या मनमोकळेपणाने केलेल्या पोस्टस् म्हणजे संधी वाटते का घाणेरड्या कमेंटस करायला?? असे वागून तुम्ही स्वत: उघडे पडता हे लक्षात ठेवा पुरूषांनो..

- सई मनोज देशमाने

Updated : 29 Nov 2020 5:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top