Home > Max Woman Talk > राजकारण चांगलं नसेल असे वाटते, तर महिलांनी तिथं यायलाच हवं...

राजकारण चांगलं नसेल असे वाटते, तर महिलांनी तिथं यायलाच हवं...

राजकारण चांगलं नसेल असे वाटते, तर महिलांनी तिथं यायलाच हवं...
X

गेली ३२ वर्ष पत्रकारितेत अनुभव असणाऱ्या राही भिडे यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातील पत्रकारिता आणि महिलांचे स्थान यावर भाष्य केलं आहे, राजकीय विश्लेषणाबरोबरच महिला पत्रकारांनी राजकीय माहिती घेणं आणि राजकीय पत्रकारितेत येणं गरजेचं आहे.या क्षेत्रातील राही भिडे यांची कहाणी कशी होती ? पाहुयात..

एखादी महिला पत्रकार म्हणून काम करते तेव्हा आजही समाज त्या महिलेकडे फार वेगळ्याच नजरेने पाहत असतो. मुळात पुरुषांचा समजलं जाणाऱ्या या क्षेत्रात महिलांचे प्रमाण तसं कमीच आहे. पण हाच समज मोडून काढण्यासाठी अनेक महिला पुढे आल्या आणि त्यांनी पत्रकारितेत काम करत आपल्या कामातून एक ठसा उमटवला. पण खरंच महिलांनी पत्रकारिता या क्षेत्रात करिअर करणं सोपं आहे का? एक महिला पत्रकार म्हणून काम करत असताना कोण कोणत्या अडचणी येतात? या सगळ्याविषयी तुमच्या मनात ज्या काही शंका आहे त्या सर्व शंका दूर होतील कारण MaxWoman Conclave मध्ये ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी त्यांचा संपूर्ण पत्रकारितेचा अनुभव कथित केला आहे.. त्यांचा हा अनुभव ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील...

वेवेवेगळ्या क्षेत्रात गगनभरारी घेतलेल्या महिलांचा मॅक्स वूमन आयोजित आणि महाचहा प्रस्तूत मॅक्स वूमन कॉन्क्लेव्हमध्ये सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताबा जेष्ठ पत्रकार राही भिडे म्हणाल्या की, मी 32 वर्षे राजकीय पत्रकारिता करीत आहे. या प्रवासात अनेक अनुभव आले. मात्र या सगळ्याचं मूळ बालपणी शाळेत बातम्या वाचून दाखवण्यात आहे. नक्की काय होतं त्यांच्या शाळेत तर, शाळेत असताना प्रार्थना झाल्यानंतर सर्वांना दोन बातम्या वाचून दाखवाव्या लागत. यामध्ये मग सगळ्या बातम्या या महाराष्ट्रातील इतर ठिकाणी घडलेल्या असायच्या व त्या सर्वजण वाचून दाखवत असे. यामध्ये प्रामुख्याने खून, मारामारी, दरोडे अशाच बातम्या असायच्या. असं सगळं असताना स्थानिक बातम्या नसायच्या, असं सगळं असताना एके दिवशी त्यांच्या घराजवळच एका गोठ्याला आग लागली आणि त्या गोठ्यात असणाऱ्या एका रेडकाला त्याच्या झळा बसल्या. हे ज्यावेळी राही भिडे यांना समजल्यानंतर वेळ काय न बघता त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी त्याचं वार्तांकन केलं. अगदी शाळेत असल्यापासूनच पत्रकारितेविषयी त्यांची असलेली ही ओढ होती. त्यांनी मध्यरात्री जागून लिहिलेली ही बातमी दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये आल्यानंतर त्यांनी ती वाचून दाखवली. म्हणजे एखादं काम करत असताना आपल्याला त्या कामाविषयी आत्मीयता असणं गरजेचं असतं आणि जर आत्मीयता असेल तर ते काम करण्यासाठी वेळ काळ याचं कोणतंही बंधन राहत नाही.

या सगळीतूनच त्यांच्या राजकीय पत्रकारितेला सुरुवात झाली. या काळात शरद पवार यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेक राजकारण्यांचे किस्से राही भिडे यांनी यावेळी सांगितले. जर समाजात परिवर्तन घडवायचं असेल तर प्रत्येकाने लिहीलं पाहिजे. जर आपण लिहीलं तरी समाजात परिवर्तन घडण्यास मदत होईल असंही त्या म्हणाल्या. आता जवळपास 32 वर्षांचा पत्रकारितेचा त्यांना अनुभव आहे. या अनुभवात त्यांना आलेले अनेक चांगले वाईट प्रसंग त्यांनी MaxWoman आयोजित MaxWoman Conclave मध्ये सांगितले आहेत. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही MaxWoman च्या फेसबुक आणि युट्युब चॅनेल ला नक्की भेट द्या...

Updated : 16 May 2023 2:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top