Home > Max Woman Talk > नायब तहसीलदार पदी निवड झालेली प्राजक्ता रहातेय पत्र्याच्या झोपडीत

नायब तहसीलदार पदी निवड झालेली प्राजक्ता रहातेय पत्र्याच्या झोपडीत

नायब तहसीलदार पदी निवड झालेली प्राजक्ता रहातेय पत्र्याच्या झोपडीत
X

स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे आपल्याकडे बरेच आहेत. या परिक्षा पास होउन आपण मोठे अधिकारी व्हायचं आणि घरची परिस्थिती सुधारायची हा या मागचा हेतू. पण या परिक्षांमध्ये सर्वच उत्तीर्ण होतात असं नाही. जे पास होतात त्यांना नियुक्ती मिळतेच असं नाही आणि ज्यांना नियुक्ती मिळते त्यांना जॉयनींग मिळेल असं नाही.

हे सगळं घडतं कारण ते म्हणतात ना "शासकीय काम आणि दहा दिवस थांब" मुळं. असाच काहीसा प्रकार घडलाय अमरावतीतील प्राजक्ता बारसेच्या बाबतीत. प्राजक्ता बारसे 2018 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली. आणि तिची नायब तहसीलदार पदी निवड करण्यात आली. पण त्यांना जॉयनींग मात्र अद्याप देण्यात आलेली नाही.

प्राजक्ता बारसे ही तरुणी अमरावती जिल्ह्यातील अकोली गावची रहिवासी आहे. ती लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली. नायब तहसीलदार पदी निवड झाल्याने तिला लवकरच नायब तहसीलदार पदी रुजू व्हावं लागेल अशी अपेक्षा होती. त्यांची निवड होवून एक वर्ष झालं तरी प्राजक्ताच्या पदरी निराशा आहे.

प्राजक्ता म्हणते, "आधिच घरची परिस्थिती हालाकिची आहे. आमच्यावर उपासमारिची वेळ आलेय असं देखील तुम्ही म्हणू शकता. मनात खुप नकारात्मक विचार येतायत. आई वडील मजुरी करतात. ते विचारतात आणखी किती दिवस वाट बघायची? 100 रुपये मजुरीत घर चालत नाही."

"परिक्षा पास झाल्यावर आता घरी चांगले दिवस पाहायला मिळतील अशी आशा होती. मात्र कोरोनाच संकट आलं आणि त्या पाठोपाठ मराठा आरक्षणाचा विषय यात वेळ निघत गेला. शेवटी हाती आली ती निराशा." असं प्राजक्ता सांगते.

प्राजक्ता सारखे महाराष्ट्रात जवळपास ४१३विध्यार्थी लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मात्र त्यांना अद्याप पदावर नियुक्ती न मिळाल्याने मिळेल ती कामे करून सद्या ते दिवस काढताहेत. रात्रीचा दिवस करून परिस्थितीची जाणीव ठेवत यश संपादन करणाऱ्या या विधर्थ्यनाची व्यथा शासन समजून घेऊन त्यांना पदावर रुजू करतील का? हा प्रश्न आहे.

Updated : 27 Jun 2021 12:30 PM GMT
Next Story
Share it
Top