Home > Max Woman Talk > मृत व्यक्तीेचे Aadhar Card आणि Pan Card कसे रद्द कराल ?

मृत व्यक्तीेचे Aadhar Card आणि Pan Card कसे रद्द कराल ?

मृत व्यक्तीेचे Aadhar Card आणि Pan Card  कसे रद्द कराल ?
X

Aadhar Card आणि Pan Card भारतातील नागरिकांसाठी अगदी महत्वाची कागदपत्रे आहेत. बॅंकेतील आर्थिक व्यवहार असोत किंवा वैयक्तिक कामं असोत पॅन कार्ड (PAN Card) आणि आधारकार्ड (Aadhaar Card) ही दोन कागदपत्रे असणं आवश्यक आहे. ही दोन कागदपत्रं आपल्याजवळ नसतील तर आपल्या व्यवहारीक कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. ही इतकी महत्वाची कागदपत्रे व्यक्ती हयात असताना तिच्या आयुष्यात खूप महत्वाची भुमिका बजावतात पण एखाद्या त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या कागदपत्रांचा काही उपयोग असतो का? या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कागदपत्रांचा गैरवापर तर होणार नाही ना? अशी घालमेळ सतत मनात सुरू असते. मग अशा व्यक्तींच्या या ओळखपत्रांच नेमकं काय करायचं? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

मृत्यूनंतर Pan Card चं काय करावं ?

आपलं पॅनकार्ड हे बँकेच्या खात्यांशी संलग्न असतं. शिवाय बँकेची कोणतीही इतर कामं Pan Card आणि Aadhar Card शिवाय होतच नाहीत. परंतू Pan Card मुख्यतः बँक खातं, डिमांट खातं, आयकर रिटर्न, इनकम टॅक्स रिटर्नसाठी आवश्यक असतं.

त्यामुळे, जिथे पॅन कार्ड अत्यावश्यक आहे ती खाती पूर्णपणे बंद होईपर्यंत सुरक्षित ठेवावी. उदाहरणार्थ, आयकर रिटर्न भरण्यापासून Income tax विभागाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ITR दाखल करताना Pan Card जपुन ठेवलं पाहिजे. मात्र एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच कालावधीत आयकर विभागाकडे पॅनकार्ड सरेंडर करणे गरजेचं असतं. पॅनकार्ड बंद करण्यापूर्वी संबंधित मृत व्यक्तीची सर्व बँक खाती बंद केली आहेत की नाही, याची दक्षता करून घेणं हे सर्वात महत्वाचं आहे.

Pan Card सरेंडर कसं कराल ?

मृत व्यक्तीचे Pan Card बंद करण्यासाठी, त्या व्यक्तीच्या नातेवाईकांपैकी एकाला पॅन कार्ड सरेंडर साठी अर्ज करू द्या. अर्जामध्ये मृत व्यक्तीचे नाव, पॅन क्रमांक, मृत व्यक्तीची जन्मतारीख या माहितीसह मृत व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रत आणि पॅन कार्ड आयकर विभागाकडे जमा करा.

Aadhar Card कसे रद्द कराल?

बऱ्याचदा हयात असलेल्या व्यक्तींच्या आधारकार्डचा गैरपवापर केला जातो. मग व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा गैरवापर होणार नाही कशावरून? याचसाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी ते तातडीने रद्द करणे आवश्यक असते. आधार कार्ड रद्द करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया किंवा अर्ज करण्याची गरज नाही. जर एखादी व्यक्ती मृत झाल्याची माहिती कोणत्याही देवाणघेवाण डेटाबेसमध्ये असेल तर ती माहिती त्वरित थांबवावी. मृत व्यक्तीचे आधार सरेंडर केल्यास किंवा मृत्यू प्रमाणपत्राशी लिंक केल्यास त्या आधारकार्डचा गैरवापर टाळता येऊ शकतो.

Updated : 3 Nov 2021 9:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top