Home > Max Woman Talk > 'कर्ता' होणं सोपं नसतं!"

'कर्ता' होणं सोपं नसतं!"

कर्ता होणं सोपं नसतं!
X

Happy Men's Day इथे असलेल्या माझ्या मित्रांनो!

पुरुषप्रधान संस्कृतीने जसं बायकांचं नुकसान केलंय तसंच पुरुषांचंही नुकसान केलं आहेच...

तीन पेक्षा अधिक वेळा मी शक्यतो रिपोस्ट करत नाही पण ही पोस्ट त्याला अपवाद आहे.

(रिपोस्ट)

#battlesfoughtalone

नोकरी न मिळणं ,मिळाल्यावर ती टिकवणं

प्रमोशन डीझर्व करत असूनही नाकारलं जाणं

त्यात वेगळी वाट निवडली असेल तर तिथे धक्के आणि समाजात टोमणे खाणं

बिझनेस असेल तर तो वाढवणं, टिकवणं ,तोट्यात असेल तर झोप उडणं एक ना हजार प्रॉब्लेम्स ला दरदिवशी तोंड देत शांत राहणं

घरातल कुणी आजारी असेल तर त्याला उत्तम उपचार मिळावे म्हणून सर्वात चांगला डॉक्टर ,हॉस्पिटल शोधण्यासाठी जीवाचं रान करणं

त्यासाठी न चुकता ,स्वतःची हौस मौज बाजूला ठेवून मेडिक्लेमचे हफ्ते भरणं, वेळप्रसंगी पैसे उभे करून माणूस जगवणं

मुलांना ,बायकोला वेळ देता येत नाही म्हणून गिल्टी वाटुनही सुटी घेता न येणं आणि मग त्याची भरपाई करण्यासाठी अजून अजून कष्ट करायला हवेत अस वाटणं

मिळालेल्या पैशात घराचे ,गाडीचे ,इन्श्युरन्स चे हप्ते , मुलांची फी, आई बाबांना गावाकडे पाठवायचे पैसे याचा हिशोब करत जुळणी करत राहणं

स्वतःची आजारपणं अंगावर काढत "काहीही होत नाही मला"अस स्वतःला सांगत राहणं

व्यसन करण्यात , मित्रांना भेटण्यात, टीव्हीवर काहीबाही बघण्यात , क्षणिक आनंद मिळत असेल तर तो शोधून चिमटीत घट्ट पकडून ठेवायची धडपड करणं

घरातून कुठलीही मागणी आली तर 'नाही' म्हणता न येणं

खूप खूप प्रेम असूनही भावनिक पातळीवर ते सांगता, दाखवता न येणं

मुलांची वेगळी घरटी झाली की भकास, उदास वाटणं

वाईट वाटणं, रडू येणं, अपमान जिव्हारी लागणं ,प्रचंड भीती वाटणं , हेल्पलेस वाटण, सगळं सोडून निघून जावं अस वाटण आणि तरीही पुन्हा पुनः धडपडत ,ठेचकाळत उभं राहणं

जे वाटतंय ते कुणालाही सांगता न येणं कारण तशी व्यवस्थाच आपल्या समाजात नसणं

आणि म्हणूनच अनेकदा वड्याचं तेल वांग्यावर काढणं

स्वतःला 'सिद्ध' करण्याचं प्रचंड प्रेशर सतत असणं आणि तरीही आपल्याला काही फरक पडत नाही असा अभिनय करणं

घरातल्यांच्या गरजा पूर्ण करण्यात , समाजात असलेली आपली सो कॉल्ड इमेज टिकवण्यात आपण कमी तर पडणार नाही ना ? अशी भीती मनात असूनही ती बोलून न दाखवता येणं

नातेसंबंध, व्यवसाय,नोकरी ,घर इत्यादी मधले असह्य ताण झेलत आला दिवस ढकलत राहणं आणि फारच झालं तर आयुष्य संपवून टाकणं

रूप,गुण,अश्रू,कर्तृत्व यातील कशाचाही जोरावर आपली भावनिक सत्ता(पर्यायाने प्रत्यक्ष सत्ता) टिकवण्यासाठी manipulate करत राहणाऱ्या एक किंवा अनेक स्त्रियांसोबत आयुष्य जगावं लागणं

अशी असंख्य बॅटल्स पुरुष लढत असतो ...एकटा!

Yes ! All on his OWN !!

आपण त्याच्या सोबत आहोत असं वाटलं तरी तसं नसतं कारण कुणाला सोबत घेऊन लढायचं असतं हेच त्याला शिकवलं गेलेलं नसतं.

तेव्हा

बाई मी स्वतःसाठी जगलेच नाही

आयुष्यभर दुसऱ्यासाठी राबले

बायकांचा जन्मच मेला वाईट ! असं म्हणणाऱ्या स्त्रियांनी एकदाच फक्त एकदाच

स्त्री पुरुष समानता अनुभवाच!

आपल्याकडे स्त्रीच अर्थार्जन किंवा करिअर हे तिचं कर्तृत्व, शिक्षणाचा उपयोग ,स्वतःची ओळख घडवणं आणि घरच्या पिठाला आपलं मीठ इतपतच मर्यादित आहे.

ज्या स्त्रिया आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहेत त्यांच्यातील 80%जणींची कर्तृत्वाची व्याख्या ऑनलाइन शॉपिंग आणि 'मी माझ्या पैशाचं हवं ते करेन' च्या पुढे गेलेली नाही.

त्यामुळे उद्या नोकरी/धंदा नसेल तर घर कस चालणार ,आयुष्यात उभं कस राहणार , समाजाला तोंड कसं देणार अशी वेळ येणाऱ्या स्त्रिया अजूनही तुलनेने खूप कमी आहेत.

गरज पडल्यावर स्त्री घर चालवू शकते यात दुमत नाहीच पण त्याच प्रमाण मध्यमवर्गीय ,उच्च मध्यमवर्गीय समाजात किती आहे तेवढं तपासून बघा.

एकदाच 'कर्ता' बनून बघा! समाजातली आपली 'पुरुष ' म्हणून प्रतिमा सांभाळताना काय करावं लागतं याचा एकदा अनुभव घ्या.

Step into his shoe and you will know where does it pinch!

शेवटी जबाबदारी कुणाची असते? जो घेतो त्याची किंवा ज्याला अपरिहार्यपणे ती घ्यावीच लागते त्याची.

(हे त्या 70% पुरुषांबद्दल आहे जे तुमच्या माझ्या घरात असतात. आपला नवरा,वडील,भाऊ,मित्र,इत्यादी. बायकांवर अत्याचार करणाऱ्या, त्यांच्या जीवावर आयुष्य जगणाऱ्या, मारहाण,शिवीगाळ करणाऱ्या, मानसिक छळ करणाऱ्या त्या 30% जमातीबद्दल मी बोलतच नाहीये

आणि विकृत असलेल्या, बाई म्हणजे फक्त शरीर किंवा आपली मालमत्ता समजणाऱ्या त्या उर्वरित पुरुषांबद्दल देखील ही पोस्ट नाहीये. सरसकट प्रतिक्रिया देण्या आधी नीट वाचा.)

(रिपोस्ट)

© गौरी साळवेकर



(साभार - सदर पोस्ट गौरी साळवेकर यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Updated : 20 Dec 2025 3:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top