Home > Max Woman Talk > घूंघटमधील सीक्रेट सुपरस्टार

घूंघटमधील सीक्रेट सुपरस्टार

नवविवाहिता आणि गिटारची सुरावट : एका व्हायरल व्हिडिओतून उभा राहिलेला सांस्कृतिक प्रश्न

घूंघटमधील सीक्रेट सुपरस्टार
X

सोशल मीडियावर अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने पुन्हा एकदा परंपरा आणि आधुनिकता यांच्या संगमाबद्दलची चर्चा चिघळवली आहे. एक नवविवाहित चेहेऱ्यावर घुंघट ओढून बसलेली हातात गिटार घेऊन आपली कला सादर करताना दिसते. तिच्या बाजूला बसलेल्या महिलांची सतत तिच्या घूंघटावर नजर ठेवण्याची धांदल, आणि त्याच वेळेस ती अत्यंत मधुर स्वरात आणि आत्मविश्वासाने गात असलेले गाणे या दोन विरोधी जगांचा समोरासमोर आलेला ताण हा व्हिडिओ जणू उघडपणे दाखवतो.

(संदर्भ: https://www.instagram.com/reel/DRvgq1DEqHr/?utm_source=ig_embed&ig_rid=d9350785-c7fb-44a5-8e5d-32bc90205266

या व्हिडिओतील आकर्षण तिच्या गिटार वाजवण्याच्या कौशल्यात आहे, तरीसुद्धा सोशल मीडियावरील कमेंट्स पाहता असे दिसते की लोकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू तिचं गाणं किंवा गिटार वाजवणं नसून तिच्या चेहेऱ्यावर सतत जबरदस्तीने खाली ओढला जाणारा घूंघट होता. अनेकांनी तिच्या आवाजाचं आणि आत्मविश्वासाचं कौतुक केलं पण हा व्हिडिओ बघताना असं वाटतं की तिच्या टॅलेंट पेक्षा चेहेऱ्यावरून मागे सरकणार घुंगट सतत पुढे ओढण जास्त महत्वाच आहे का?

सोशल मीडियावरच्या अनेक कमेंट्समध्ये एक सामायिक प्रश्न दिसून येतो — परंपरा आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांच्यातील सीमेचा नेमका अर्थ काय? नवविवाहित स्त्रीला केवळ ‘नववधू’ या भूमिकेच्या नावाखाली, स्वतःची ओळख आणि कौशल्य झाकोळून टाकणाऱ्या रूढींमध्ये अडकवणे योग्य आहे का?

घूंघट हा अनेकांना सांस्कृतिक आदराचा प्रतीक वाटतो; काहींसाठी तो सन्मानाचा आणि वंशपरंपरेचा भाग आहे. परंतु बदलत्या काळात हा अनेक वेळा स्त्रियांच्या स्वतंत्र अभिव्यक्तीवर नियंत्रणाचे साधन बनतो. खासकरून जेव्हा एखादी स्त्री स्वतःची कला प्रकट करू पाहते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पडणारी ही सावली तिच्या ओळखीपेक्षा महत्त्वाची ठरावी अशी अपेक्षा ठेवली जाते, ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे.

आजची तरुण पिढी परंपरेचा अनादर करत नाही; ती फक्त त्या परंपरांना स्वतःच्या ओळखीशी सुसंगत करण्याचा प्रयत्न करत आहे. कला, संगीत, शिक्षण, करिअर या सर्व क्षेत्रांत महिला आपले स्थान निर्माण करत आहेत. अशा वेळी विवाहानंतर लगेचच एखाद्या स्त्रीला परंपरेच्या कठोर चौकटीत बसवलं जाणं हा चर्चेचा मुद्दा होणं तर स्वाभाविक आहे.

या व्हीडिओने एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणला परंपरा जपताना व्यक्तिमत्वाची घुसमट होणार नाही, याचा विचार आता प्रत्येक पिढीला नव्याने करावा लागेल.

कला, कौशल्य आणि व्यक्तिमत्व यांना परंपरेच्या मागे दुय्यम स्थान दिलं जाणं हा आजच्या समाजात अधिकाधिक असह्य होत चाललेला विरोधाभास आहे.

Updated : 4 Dec 2025 4:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top