Home > Max Woman Talk > महिलांना कर्ज देणारी बॅंक: अलाहाबाद सेवा बॅंक

महिलांना कर्ज देणारी बॅंक: अलाहाबाद सेवा बॅंक

कोणतीही बॅंक कमीत कमी कर्ज घेण्याचा सल्ला देते का? कमीत कमी कर्ज घ्या आणि जास्तीत जास्त उत्पन्नाची साधनं उभी करा... असा सल्ला देत महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं करणारी अलाहाबाद सेवा बॅंक नक्की आहे तरी काय? मॅक्सवूमनच्या प्रत्येक सखीने वाचावा असा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा लाख मोलाचा लेख

महिलांना कर्ज देणारी बॅंक: अलाहाबाद सेवा बॅंक
X

तुम्ही कल्पना करू शकता का ?

कर्ज देण्याचा धंदा करणारी बँक कर्जदारांना सांगते आहे की, कमीत कमी कर्जे काढा आणि काढलीत तर त्यातून उत्पन्नाची साधने कशी उभी राहतील हे बघा ! अशी बँक आहे अहमदाबाद स्थित सेवा बँक!सेल्फ एम्प्लॉयीड वूमेन्स अससोशिएशन (SEWA) ही कष्टकरी स्त्रियांची ट्रेड युनियन इला भट या गांधीवादी विदुषीने अहमदाबाद मध्ये सत्तरीच्या दशकात सुरु केली.

आपल्या सभासद स्त्रियांना सतत रक्तपिपासू खाजगी सावकारांकडे जावे लागते. हे बघितल्यावर १९७४ साली "सेवा बँक" स्थापन केली गेली.

जयश्री व्यास, व्यवस्थापकीय संचालक आहेत; त्या सांगतातआम्ही स्त्रियांनां बचती करायाला प्रोत्साहन देतो; स्त्री कर्ज मागायला आली की आम्ही सर्वप्रथम तुला कशासाठी कर्ज हवे ते विचारतो; कमीत कमी कर्ज घे असे सांगतो. आणि स्वयंरोजगारातून नवीन उत्पन्नाची साधने घेण्यासाठी कर्ज घ्यायला प्रोत्साहन देतो.

सेवा बँकेच्या ६ लाख स्त्रिया ठेवीदार / कर्जदार आहेत; मार्च २०२१ मध्ये ३२० कोटी ठेवी आहेत आणि दिली गेलेली कर्जे आहेत. १९० कोटी; एका वर्षांपूर्वी २०० कोटी होती, ती कमी झाली म्हणून जयश्री व्यास आंनद व्यक्त करतात.

या विरोधी चित्र आहे मायक्रो फायनान्स कंपन्या, स्मॉल फायनान्स बँका, गोल्ड लोन कंपन्या आणि अनेक प्रकारच्या कंपन्यांचे ज्या फक्त गरिबांना कर्जे देतात.

या सऱ्या कर्ज संस्थांचा लोन पोर्टफोलिओ दरवर्षी दर शेकडा ४० टक्क्यांनी वाढत आहे; कोरोना काळात तर जास्तच; सध्याचा मिळून लोन पोर्टफोलिओ ३,५०,००० कोटी रुपये आहे.
यातील अनेक स्टॉक मार्केटवर लिस्टेड आहेत; आणि त्यांचे भाव नेहमी चढे असतात.

गरिबांना कर्ज हवी आहेत तर आम्ही काय करणार ? आम्ही तर त्यांची सेवा करत आहोत.

देशात दहा हजार सेवा बँकांची गरज आहे; ज्या गरीब कर्जदारांचे कॉउंसेल्लिंग करतील , कर्जातून त्यांच्या उत्पन्न क्षमतेत वाढ होईल हे बघतील आणि गरिबांचा बकरा करणार नाहीत.

संजीव चांदोरकर (१५ जुलै २०२१)Updated : 16 July 2021 8:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top