Home > Know Your Rights > संकटात सापडलेल्या महिलांसाठी नविन टोल फ्री नंबर...कॉल करा १८१ वर

संकटात सापडलेल्या महिलांसाठी नविन टोल फ्री नंबर...कॉल करा १८१ वर

संकटात सापडलेल्या महिलांसाठी नविन टोल फ्री नंबर...कॉल करा १८१ वर
X

संकटकाळात महिलांच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने १८१ ही नवा टोल फ्री हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. वर्षातील १२ महिने आणि दिवसातील २४ तास हा क्रमांक महिलांसाठी सुरु राहणार आहे. राज्यातील महिलांवर होणारे अत्याचार कमी होण्यासाठी या निविन क्रमांकाची सुरवात करण्यात आली आहे. हुंडा बळी असो किंवा बालविवाह कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी महिलांना या क्रमांकावर मदत मिळू शकणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती सुद्धा या क्रमांकावर उपलब्ध होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ' मिशन शक्ती' या योजनेअंतर्गत हा क्रमांक सुरु करण्यात आला आहे. आगामी १५ दिवसांत तो महिलांसाठी कार्यरत होईल, अशी माहिती राज्याचे महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.


Updated : 16 Jan 2023 1:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top