Home > Know Your Rights > मोठी बातमी : धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांचा यु टर्न?

मोठी बातमी : धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांचा यु टर्न?

मोठी बातमी : धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांचा यु टर्न?
X

परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप करणारी गायिका तरूणी रेणू शर्मा आपणच या प्रकरणात फसत चालल्याचे दिसू लागताच तिची भाषा बदलली असून आता मीच माघार घेत आहे, जशी तुमची इच्छा आहे, असे म्हणत तिने हे प्रकरण आता फार ताणून न धरण्याची मानसिकता केली असल्याचे संकेत दिले आहेत.

रेणू शर्मा यांनी ट्विट करत "एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या. कोणतीही माहिती नसताना जे मला ओळखतात तेदेखील चुकीचे आरोप करत असतील तर सर्वांनी मिळून निर्णय घ्या. ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी माघार घेते," असं म्हटलं आहे.

"जर मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का नाही आले? मी जरी मागे हटले तरी, कोणत्याही पक्षाचं नाव न घेताही मला खाली पाडण्यासाठी आणि आता हटवण्यासाठी इतक्या लोकांना एकत्र यावं लागलं आणि त्यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी लढत होती याचा अभिमान आहे. आता तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहा," असंही तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेबाबत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर या महिलेने ब्लॅकमेल केल्याचा दावा आणखी दोघांनी केला आहे. भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सदर महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली. मनसे नेते मनीष धुरी आणि जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी या अधिकाऱ्यानं देखील रेणू शर्मावर असाच आरोप केला आहे.Updated : 15 Jan 2021 12:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top