Home > Know Your Rights > पतीचा पगार वाढल्यास पोटगीची रक्कमही वाढणार, उच्च न्यायालयाचा निर्णय

पतीचा पगार वाढल्यास पोटगीची रक्कमही वाढणार, उच्च न्यायालयाचा निर्णय

पतीचा पगार वाढलाय आणि पत्नीचे घरभाडे 1500 रुपयांनी वाढलेय त्यामुळे पतीने पत्नीला अंतरिम देखभाव भत्ता दिला पाहिजे असं न्यायालयाने म्हटलं आहे.

पतीचा पगार वाढल्यास पोटगीची रक्कमही वाढणार, उच्च न्यायालयाचा निर्णय
X

"पतीचा पगार वाढल्यास पत्नीला मिळणारी पोटगीही वाढेल" असा निकाल पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या पंचकुला कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार पतीचा पगार वाढला असल्यास पत्नीला अंतरिम देखभाव भत्ता मिळाला पाहिजे.

नेमकं प्रकरण काय?

पंचकुला येथील रहिवासी असलेल्या वरुण जागोटा यांनी उच्च न्यायालाच्या मार्च 2020 च्या निर्णयाला आव्हान देत. वाढीव भत्ता देता येणार नाही असं सांगीतलं. याचिकाकर्ते वरुण यांच्या म्हणण्यानुसार "कौटुंबिक कोर्टाने जे निकालात म्हटले आहे की याचिकाकर्त्याचा पगार 95 हजार वरून 114000 झाला आहे. सर्व वजावटीनंतर त्यांना पगार म्हणून 92175 रुपये मिळतात. अशा परिस्थितीत 28 हजार अंतरिम पोटगी भत्ता कसा द्यावा? हे योग्य नाही."

दरम्यान, या प्रकरणात न्यायालयाने वरुण यांची याचिका फेटाळली असून न्यायालयाने सांगीतले की "पंचकुला कौटुंबिक न्यायालयाचा आदेश जर कायद्याच्या विरोधात असेल तेव्हा असे होईल. या प्रकरणात असे काहीही नाही. एकीकडे पतीचा पगार वाढला असताना दुसरीकडे पत्नीच्या घराचे भाडेही 1500 रुपयांनी वाढले आहे. अशा परिस्थितीत कौटुंबिक कोर्टाने आपला निकाल देताना सर्व वस्तुस्थितीवर विचार केला आहे आणि आदेश तपशीलवार आहे."

Updated : 9 Feb 2021 7:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top