Home > Know Your Rights > मर्यादा संपत असलेलं पासपोर्ट रिन्यू कसं कराल? जाणून घ्या सहज सोप्या स्टेप्स...

मर्यादा संपत असलेलं पासपोर्ट रिन्यू कसं कराल? जाणून घ्या सहज सोप्या स्टेप्स...

मर्यादा संपत असलेलं पासपोर्ट रिन्यू कसं कराल? जाणून घ्या सहज सोप्या स्टेप्स...
X

कोरोना संक्रमण आता हळू हळू कमी होत आहे. अशात जर आपण विदेशात फिरण्याची स्वप्न पाहत असाल तर ही बातमी आपल्यासाठीच आहे. विदेशात जाण्यासाठी आपल्याकडे पासपोर्ट असणं गरजेचं आहे. अशात जर आपल्या पासपोर्ट ची मर्यादा संपत आली असेल किंवा संपली असेल तर आपण या सोप्या स्टेप्स ना फॉलो करत आपले पासपोर्ट रिन्यू करू शकता.

स्टेप टू स्टेप प्रक्रिया

स्टेप 1 - फॉर्म कसा भराल?

• सर्वात आधी पासपोर्ट सुविधेच्या ऑनलाइन पोर्टल पर जाऊन लॉगइन करा.

• अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट / रिन्यू ऑफ पासपोर्ट च्य़ा लिंक वर क्लिक करा.

• त्यानंतर अल्टरनेटिव वन वाल्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर एक नवं पेज सुरू होईल.

• आपल्याला हवं असेल तर ऍप्लीकेशन फॉर्म ला डाउनलोड देखील करू शकता.

• त्यानंतर फॉर्म भरून वेबसाइट वर अपलोड करू शकता.

• तिथेच ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी 'fill the application form online' वर क्लिक करा.

स्टेप 2- अपॉइंटमेंट घेणं आवश्यक

• ऑनलाइन फॉर्म च्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आवश्यक तपशील भरून सबमिट करायची आहे.

• यानंतर लॉगिन करताना, पहल्या पेज वर जाऊन सबमिट ऍप्लीकेशन वर क्लिक करा.

• पेमेंट करण्यासाठी रेडियो बटणावर क्लिक करा.

• Pay and Schedule Appointment च्या पर्यायावर वर क्लिक करा.

• ऑनलाइन पेमेंट पर्याय निवडत पुढे जा.

• लक्षात ठेवा, पासपोर्ट ऑफिस मध्ये अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करणं आवश्यक आहे.

स्टेप 3- अशी घ्याल अपॉइंटमेंट

• यानंतर आपल्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राची लिस्ट आपल्या स्क्रीन वर येईल.

• यामध्ये आपल्या सोयीनुसार अपॉइंटमेंट ची तारीख आणि वेळ ठरवा.

• यानंतर पे आणि बुक अपॉइंटमेंट वर क्लिक करा.

• पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा पासपोर्ट सेवेच्या वेबसाइट वर जा.

• जर आपल्याला तिथे अपॉइंटमेंट कन्फर्म झाल्याचं पेज दिसत आहे.

• तिथेच संपूर्ण तपशील दिसू लागेल.

• अर्जाची प्रिंट काढा आणि प्रिंट ऍप्लीकेशन वर क्लिक करा. दरम्यान अपॉइंटमेंट नंबर दिसत राहील.

स्टेप 4 - पासपोर्ट ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी कागदपत्र सोबत ठेवा.

• पासपोर्ट ऑफिस जातेवेळी प्रिंटची पावती सोबत घेऊनच जा.

• पावती दाखवल्यानंतरच आपल्याला प्रवेश मिळेल.

• यानंतर तिथे आपल्या कागदपत्रांची मागणी केली जाईल.

• कागदपत्रांसोबतच फोटोदेखील द्या.

• यासह एक सही देखील द्यावी लागेल. हीच सही आपल्या पासपोर्ट वर देखील दिसेल.

स्टेप 5- आपल्या पासपोर्टची स्टेटस असा कराल ट्रॅक...

• यानंतर आपल्याला एक पावती मिळेल, जिच्यामुळे आपण आपल्या पासपोर्टीचा स्टेटस ट्रॅक करू शकता.

• यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन होईल आणि एका आठवड्यात आपला पासपोर्ट पोस्टाद्वारे आपल्या घरी येऊन जाईल.

• पासपोर्ट मिळाल्यानंतर आपल्याला जुनं पासपोर्ट ऑफिसमध्ये जमा करावं लागेल.

• जर आपला पासपोर्ट हरवला असेल किंवा चोरी झाला असेल तर पोलिसांत तक्रार नोंदवणं आवश्यक आहे.

Updated : 15 Nov 2021 11:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top