Home > Know Your Rights > #ThanksDrAmbedkar : बाबासाहेबांमुळं 'माणूस' म्हणून आमच्या जगण्याला अर्थ मिळाला



#ThanksDrAmbedkar : बाबासाहेबांमुळं 'माणूस' म्हणून आमच्या जगण्याला अर्थ मिळाला



#ThanksDrAmbedkar :  बाबासाहेबांमुळं माणूस म्हणून आमच्या जगण्याला अर्थ मिळाला


X

Every person is equal before the law कायद्याच्या अगोदर सर्व माणसं समान आहेत. असं म्हटलं जातं. मात्र, वर्षोनुवर्ष माणसांनीच माणसाला गुलामगिरीची वागणूक दिल्यानंतर सर्व माणसं कायद्याच्या अगोदर समान कशी म्हणायची. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यानी या देशातील सर्व माणसं समान केली. माणसाला समानतेचे हक्क प्रदान करुन दिले. ज्यांनी गेले अनेक वर्ष गुलामगिरीच्या, अस्पृश्यतेच्या वेदना सहन केल्या. त्यांच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर काळ्या अंधार झालेला सूर्य प्रकाशच होते. त्यांच्या जगण्याला बाबासाहेबांमुळं अर्थ आला.

आंबेडकरी समाजातून येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या तत्वाचे पालन करणाऱ्या सत्यभामा सौंदरमल. अत्यंत कठीण परिस्थितीत बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन शिक्षण पूर्ण करणाऱ्या सत्यभामा यांच्याशी आम्ही बातचीत केली. सत्यभामा सध्या राज्यभर सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहेत. एक धडाडीची सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 

बाबासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सत्यभामा म्हणतात…


भारतीय संविधानात आणि या समाजव्यवस्थेत आम्हाला माणूसपण तुमच्यामुळे मिळालं आहे. पितृसत्ताक या समाजव्यवस्थेत महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं होतं. मात्र, भारतीय संविधानामुळे आम्हा स्त्रियांना समानता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य या सगळ्या पातळीवर स्थान मिळालं आहे.

माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. संविधानाची उद्देशपत्रिका वाचल्यानंतर प्रत्येक नागरिकांचे माणूसपण आणि हक्क जपलेलं आहे. संविधानातील मूल्यांच्या संवर्धनाचं काम आम्ही करत आहोत. महिला सक्षमीकरण, दारूबंदी, महिला प्रश्न, कौंटुबिक प्रश्न आणि शिक्षण यावर काम करत आहोत. भारतात आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानातील मूल्ये नसते तर या समाजव्यवस्थेत आणखी हजारो वर्ष आमचं माणूसपण नाकारलं गेलं असतं. असं मत सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी सांगितलं आहे.

Thanks Dr. B. R. Ambedkar : बाबासाहेबांमुळं 'माणूस' म्हणून आमच्या जगण्याला अर्थ मिळाला



Updated : 14 April 2021 8:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top