Home > Know Your Rights > स्त्रीयांच्या हक्कासाठी व्यवस्थेचे वाभाडे काढणारे बाबासाहेब

स्त्रीयांच्या हक्कासाठी व्यवस्थेचे वाभाडे काढणारे बाबासाहेब

स्त्रीयांच्या हक्कासाठी व्यवस्थेचे वाभाडे काढणारे बाबासाहेब
X

आज मी आणि देशाची अर्धी लोकसंख्या(स्त्रिया) स्त्री म्हणुन जी काही समाजात कुटुंबात वावरततोे ते डॉक्टर आंबेडकर आणि त्यानी दिलेल्या संविधानातील हक्क अधिकारामुळे. डाँक्टर आंबेडकरांनी वेगवेगळ्या आंदोलनात स्त्रियांना सहभागी करून घेतले. त्यांनी संविधान लिहिण्या अगोदर जी वेगवगळी आंदोलने सत्याग्रह केले यात पुरुषांच्या सहभागाबरोबरच स्त्रियांना सुद्धा सहभागी करून घेतले गेलं.स् वेगवेगळ्या माध्यमातुन भाषणातुन बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या माणुसपणाची दखल घेत त्याच्याबाबत समाजात असणारा भेदभाव,विषमता याबाबत व्यवस्थेचे वाभाडे काढले.

अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांना म.फुले सावित्रीमाई फूले छ.शाहु महाराज यांनी स्त्रिया, दलित या बाबत केलेले शैक्षणिक सामाजिक कार्य यांनी घेतलेली समातेची भुमिका हे पुरक ठरत गेले.

यात महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह सायमन कमिशन पुढे दिलेली मतदानाच्या बाबबतची साक्ष,.रं.धो. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा लैंगिक विषय(हस्तमैथुन आणि समलिंगी संभोग) यावरचा कोर्टात लढलेला खटला.अशा वेगवेगळ्या आंदोलनातुन भाषणातुन स्त्रियांना प्रेरणा देण्याचं आणि कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिण्याअगोदर पासुनच केलं.

मनुस्मृती दहन...25डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्त्रियांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणारे मनुस्मृती नावाच्या पुस्तकाचे दहन केले ज्यात स्त्रियांच्या माणुसपणाचं दमन करण्याचे नियम सांगितले गेले होते.

हिंदु कोड बिल च्या माध्यमातुन देशाचे पहिले कायदामंत्री असताना 1949ला हे बील डाँक्टर आंबेडकरांनी संसदेत मांडले ज्यात महिलांना संपत्ती मधील अधिकार मुल दत्तक घेण्याचा अधिकार मनासारखा जोडीदार निवडण्याचा अधिकार बहुपत्नीत्वाला विरोध अशा अनेक बाबींचा समावेश त्यात होता.परंतु पित्रसत्ता व्यवस्थेचे डोळ्यांवर झापडे पडलेल्या राजकीय पुढार्यांनी हे हिंदू कोड बील नाकारले आणि हे बील पास झाले नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजिनामा दिला. स्त्रीयांच्या हक्कासाठी मंत्रीपदाला लाथ मारणारे डॉक्टर आंबेडकर हे पहिले आणि शेवटचे व्यक्ती ठरावेत(आताचे राजकीय नेते मंत्री पदासाठी वाट्टेल तशी भुमिका घेतात पण स्त्रियांसाठी अशी भुमिका घेतलेली दिसुन नाही आले अद्याप तरी)

पुढे हेच हिंदु कोड बिल एक एक कायदा करत मंजुर झाले आणि आज महिलांना समान मजुरी,घटस्फोट,मुल दत्तक घेणे हे आणि इतर अनेक अधिनियमांचा फायदा होताना आपण बघतोय.यावरूनच बाबासाहेब आंबेडकरांची स्त्रियासंबधीची दुरदृष्टी किती होती हे दिसुन येते..

बाबासाहेब आंबेडकर यांचा हा विचार अतिशय महत्वाचा होता .....कोणत्याही समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती बघीतली पाहीजे.

डाँ आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानातील 72शब्दांच्या ऊद्देशपत्रिकेत आम्ही भारताचे लोक जे वाक्य आहे या वाक्यात आम्हा स्त्रियाचा समावेश आहे.

भारतीतीय संविधानात समता न्याय स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता लोकशाही बंधुता,समाजवाद या सर्व मुल्यांत प्रत्येक स्त्री पुरूषांना व्यक्ती म्हणून समान मानलं गेलं.

भारत हा सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे हे एका ऊदाहरणावरून आपल्याला कळेल......बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे जेव्हा भारत भेटीला तेव्हा प.मनमोहन सिंग यांना त्यांनी एक पुस्तक गिफ्ट केले होते ज्यावर त्यांनी from the oldest Democracy to the largest Democracyलिहिलं होतं यावर सिताराम येचुरी यांनी ओबांना सांगितले की mr.Obama,You are neither oldest,nor largest"(संबधित कोट लेखक संजय आवटे लिखित we the changeआम्ही भारताचे लोक यातुन घेतले आहे)याचा अर्थ असा होता की,पाश्चिमात्य देश हे कितीतरी पुढारलेले देश असताना त्या देशात स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला गेला नव्हता.म्हणजे तेथील स्त्रियांना100वर्ष लढा द्यावा लागला तेव्हा तेथील महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला ,परंतु भारतातील स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी असा कोणताच लढा द्यावा नव्हता लागला ज्या दिवशी संविधान देशात लागु झाले त्याच दिवसापासून स्त्रियांना हा आणि ईतर हक्क अधिकार मिळाले.आणि याचं श्रेय डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातं.

याचमुळे आज स्त्रिया शिक्षण नोकरी व्यावसाय सामाजिक संस्था,संघटना राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर दिसत आहेत याचं संपुर्ण श्रेय आंबेडकरांना जातं आज आम्ही बीड जिल्हयात दामिनी दारूबंदीच्या माध्यमातुन जे काम करतोय ते संविधानातील कलम ४७ नुसारच

अस असले तरी देशात महारष्ट्रात स्त्रीयांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर अत्याचार होताना दिसतात कौटुंबिक हिंसाचार,दलित महिला हिंसाचार होताना दिसत आहेत एक पत्रकार पी साईनाथ यांच्या मते देशात सर्वात वेगाने वाढणारं क्षेत्र जर कोणतं असेल तर ते उद्योग वगैरे नसुन,असमानता किंवा विषमता हे आहे(आपलं आयकार्ड) आणि ही विषमता दलित आणि स्त्रिया याबाबत प्रकर्षाने दिसुन येत आहे.याला कारण भारतीय संविधानातील तरतुदीची योग्य अमंलबजावणी न होणे याच बरोबर येथील जातियता आणि पित्रसत्ता या व्यवस्था जबाबदार असुन या दोन्ही व्यवस्थामध्ये स्त्रियांचं माणुसपण हिरावुन घेतलं जात आहे.

डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लाखो करोडो असणारे अनुयायांयी पैकी फार कमी जण संवैधानिक आणि बाबासाहेबांच्या विचारांवर चालतात बाकी मोठ्या प्रमाणावर आंबेडकरांच्या विचारांची प्रत्यक्ष व्याववहारात फारकत घेऊन पित्रसत्ता जातियतेला कवटाळत बसले आहेत आणि याचा फटका महिलांना बसत आहे.भारतीय संविधानाचा मोठ्या प्रमाणावर लाभ उच्चवर्णीय लोक ज्यात उच्चवर्णीय (स्त्रिया ही)यांना होताना दिसत असुन या स्त्रिया फक्त लाभार्थी बनत आहेत असं चित्र दिसत आहे.उच्चवर्णीय असणार्या स्त्रियांना पित्रसत्ता दिसते,पण जातियता नाही दिसत दलीत पुरूषाना जातियता दिसते पण पित्रुसत्ता दिसत नाही मात्र दलित स्त्रियाना मात्र जातियता आणि पित्रसत्ता हे दोन्ही दिसते(तसे आता बोलत आहेत म्हणा पण फार कमी) मोठ्या प्रमाणावर पदलित पुरुष व्यसनाच्या आहारी जाऊन महिलांचा छळ करतात जातियतेला विरोध करणारे मूलीने दुसर्या जातीत लग्न करू नये म्हणुन एक तर बालविवाह करतात नाही तर अशा मुलींना वाळीत टाकतात किंवा मुली मुलाचे खून करतात महिला आरक्षणाचा प्रत्यक्ष फायदा त्यांचे नवरे किंवा मुलं घेताना दिसतात स्त्रियांना आजही दुय्यम स्थान दिसुन येत असुन सत्ता संपत्ती आणि संतती बाबतचे सर्व निर्णय स्त्रियांना घेऊ दिले जात नाहीत(अपवाद वगळता) सतत स्त्रियांची प्रतिकात्मक प्रगती दाखवली जात आहे. स्वतःच्या हिमतीवर कर्तुत्व सिद्ध करणार्या महिलांचे कौतुक सोहळे केले जातात पण अशा महिलांना अनेक जिवघेण्या त्रासातुन जावं लागत आहे.

यासाठी आज खर्या अर्थाने स्त्रियांनी परिवर्तनाच्या वाहक आणि पित्रुसत्ता, जातियतेच्या दुर्वाहक बनण्याची भुमिका घेणं गरजेच आहे तरच डाँक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात स्त्रियांना स्वतःची स्वप्ने आणि ध्येय पुर्ण करण्यासाठी समान संधी मिळाव्यात यासाठी संधीची समानता उपलब्ध करून दिली आहे त्याचं सार्थक होईल आणि समतेवर आधारीत समाजनिर्मीती होण्यास मदत होईल. आजच्या दिवशी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

- सत्यभामा सौंदरमल

निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था

बीड

Updated : 6 Dec 2020 8:09 AM GMT
Next Story
Share it
Top