- यूएस कॉन्सुल जनरल म्हणून माईक हॅन्की मुंबईत रुजू
- अपक्ष व शिंदे गटात नाराजी?
- Lawasa Case : सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटूंबियांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका..
- मंत्रिमंडळात कोणत्या महिलांचा होणार समावेश..
- ''शिंदे-फडणवीसांच्या आया-बहिणी..'' रुपाली ठोंबरे भडकल्या
- मिर्ले धनगरवाडी घटनेवर चिमुरडीने लिहील होतं पंतप्रधानांना पत्र
- ''संजय राऊत व शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते'' प्रकाश महाजनांचा गौप्यस्फोट
- देश २०१४ ला स्वातंत्र्य झाला मग अमृत महोत्सव कोणता..?- अमोल मिटकरी
- तेजस ठाकरे शिवसेनेचा नवा चेहरा ? आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
- वर्षा राऊत ED कार्यालयात, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी होणार चौकशी..

औरंगाबाद ग्रामीण पोलीसांनी रोखला 'बालविवाह'
X
तालुक्यातील नारळा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना यश आले. पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतर विवाह न करण्याचा निर्णय मुलीच्या कुटुंबाकडून घेण्यात आला. पोलिसांनी तशी लेखी जवाब नोंदवून मुलीला कुटुंबियांच्या ताब्यात दिलं.
नांदेड जिल्ह्यातील 15 वर्षीय मुलीचा मुंबईतील एका मुलासोबत 5 एप्रिल रोजी विवाह पार पडणार असल्याची माहिती बीडच्या सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौदरमल यांना मिळाली होती. याबाबत त्यांनी खात्री करत मुलीच्या घराचा पत्ता काढला असता,मुलगी आणि त्याचे कुटुंब औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील नारळा येते गेले असल्याचं कळले. तसेच लग्न सुद्धा तिथंच पार पडणार असल्याची माहिती सत्यभामा यांना मिळाली होती.
त्यामुळे औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना याबाबतची माहिती सत्यभामा यांनी दिली.तसेच बालविवाह रोखण्याची विनंती केली.त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार आणि पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक पोलिसांना सूचना देत कारवाईचे आदेश दिले.
माहिती मिळताच पैठण पोलिसांनी लगेच कारवाई करत मुलीच्या घराचा शोध घेत कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी वर-वधुंच्या वयाचा दाखला मागितला,असता वधूचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असल्याचं उघडकीस आले. त्यामुळे तिचा विवाह लावता येणार नाही, अशी समज पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना दिली. १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच मुलीचे लग्न करू,असे पोलिसांनी त्यांच्याकडून लेखी घेतले.