Home > News > इंदूरीकरांवर गुन्हा दाखल होणारचं होता - तृप्ती देसाईं

इंदूरीकरांवर गुन्हा दाखल होणारचं होता - तृप्ती देसाईं

इंदूरीकरांवर गुन्हा दाखल होणारचं होता - तृप्ती देसाईं
X

मुला-मुलीच्या जन्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यावर बोलताना भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई म्हणाल्या की, ‘राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. गुन्हा दाखल होण्याआधी इंदुरीकरांच्या या वक्तव्याला प्राचीन ग्रंथांचा आधार आहे असं सांगितलं जात होतं. परंतु पुत्रप्राप्तीचा सल्ला देणे, जाहिरात करणे हे PCPNDT ऍक्ट नुसार कायदेशीर गुन्हा असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं होतं. मी किती योग्य आहे हे दाखवण्यासाठी हा वाद मुद्दामहून काही संबंध नसताना वारकरी संप्रदायाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला, हिंदुत्वाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यावर खालच्या पातळीवर बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु शेवटी सत्याचाच विजय होत असतो, इंदुरीकरांवर आता संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झालेला आहे आता त्याची सुनावणी होईल आणि सर्व सत्य जनतेसमोर बाहेर येईल.” अशी प्रतिक्रीया देसाई यांनी दिली आहे.

काय आहे नेमकं इंदुरीकर महाराज प्रकरण?

निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी फेब्रुवारी महिन्यात ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असं वक्तव्य केलं होतं. इंदुरीकरांच्या किर्तनाचा व्हिडिओ ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे यांनी ही तक्रार दाखल केली होती.

काय म्हणाल्या तृप्ती देसाई पाहा हा व्हिडीओ...

Updated : 26 Jun 2020 8:49 AM GMT
Next Story
Share it
Top