Home > News > पुणेकरांनो घराबाहेर पडताना ही खबरदारी घ्या!

पुणेकरांनो घराबाहेर पडताना ही खबरदारी घ्या!

पुणेकरांनो घराबाहेर पडताना ही खबरदारी घ्या!
X

पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असताना नागरिक निर्बंधांचे पालन करत नसल्याचं वारंवार दिसून येत आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी सरकारनं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे देखील पालन अनेक ठिकाणी होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आता पुणे महापालिकेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. यानुसार कोणतीही व्यक्ती मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी, तसेच सरकारी आणि खाजगी कार्यालयांच्या ठिकाणी आढळून आल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल, असे पत्रक पुणे महापालिकेने प्रसिद्ध केलेले आहे. महापालिकेच्या त्या-त्या विभागांमधील अधिकाऱ्यांना या कारवाईचे अधिकार देखील देण्यात आलेले आहेत. मिशन बिगीन अगेन अंतर्गत सरकार आता हळूहळू सर्व व्यवहारांना परवानगी देत असताना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन झालं पाहिजे, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. पण पुण्यामध्ये अनेकजण या निर्बंधांचे पालन करत नसल्याचे दिसल्याने आता महापालिकेने ही कडक भूमिका घेतलेली आहे.

Updated : 26 Jun 2020 6:56 AM GMT
Next Story
Share it
Top