‘हर बच्चा सुरक्षीत रहे’ अंगणवाडी सेविका बनवतायत चिमुकल्यांसाठी मास्क
X
अंगणवाडी सेवीका... एक अशी शिक्षीका जी तुमच्या मुलासाठी सर्व काही करते. कोरोना काळात याच ‘अंगणवाडीच्या बाई’ तुमच्या घरची खुशाली विचारायला आल्या असतील. पण एवढ्यावरच याच अंगणवाडी सेवीकांनी तुमच्या मुलाच्या सुरक्षेसाठी आता छोटे छोटे मास्क बनवायला सुरुवात केली आहे.
ठाण्याच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकांनी एकत्र येऊन लहान मुलांसाठी मास्क बनविण्याची कार्यशाळा सुरू केली आहे. ठाण्यातील अंगणवाडी सेविकांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. सध्या अंगणवाड्या या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे बंद आहेत, त्यामुळे या अंगणवाडी सेविकांना मास्क बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. बनविलेले हे मास्क अंगणवाडी सेविका त्यांच्या अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पोहोचवितात. सोबतच कोरोना पासून आपली सुरक्षा कशी करावी याची माहिती देखील पालकांना दिली जात आहे.
https://youtu.be/CHppsgAp9l0