Home > व्हिडीओ > ‘माझ्या दिड वर्षाच्या मुलीला मी स्पर्शही करु शकत नाही’

‘माझ्या दिड वर्षाच्या मुलीला मी स्पर्शही करु शकत नाही’

बालपणीच्या कथांमधील मिडास राजाच्या सुवर्ण स्पर्शाप्रमाणे नकोसा झालेला तो स्वत:चाच ‘कोरोना स्पर्श’… कोरोना रुग्णांच्या सेवेतील एक परिचारीकेची व्यथा…

‘माझ्या दिड वर्षाच्या मुलीला मी स्पर्शही करु शकत नाही’
X

“मला एक मुलगी आहे दिड वर्षाची, पण घरी गेल्यावर मी लगेच लाडाने तिला जवळ घेवू शकत नाही. आईनं मला घ्यावं म्हणून ती जवळपास 10 ते 15 मिनीटं रडत असते पण, मी काही करु शकत नाही. कारण मी, आयसोलेशन कक्षात असणाऱ्या कोरोना संशयीत रुग्णांची सेवा करणारी एक परिचारीका आहे.” ही व्यथा आहे मिनल कुलकर्णी यांची...

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदीवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी डॉक्टर, पोलीस, नर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी अथक प्रयत्न करत आहेत. त्यांचे आभार मानण्यासाठी देशातील जनतेने अगदी पंतप्रधानांनी सुध्दा थाळ्या वाजवल्या, दिवे लावले मात्र अशातही काही अतिउत्साही लोक कशाचीही पर्वा न करता रस्त्यावर उतरत आहेत. पण कोरोना रुग्णांच्या आयुष्यात निरोगी आरोग्याचा दिवा लावणाऱ्यांच्या आयुष्यात सध्या अंधार आहे. यापैकीच एक आहेत अकोल्यातील परिचारिका मीनल कुलकर्णी.

मिनल कुलकर्णी या अमरावतितील जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारीका आहेत, मात्र सध्या त्यांची अकोल्यातील वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन करण्यात आयसोलेशन वॉर्डसाठी विशेष प्रतिनीयुक्ती करण्यात आली आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना मिनल कुलकर्णी म्हणाल्या की, ‘मागील दोन महिने मी या आयसोलेशन विभागात काम करतेय. आमच्या पाच जणांच्या कोरोना युनीटची अमरावतीहून अकोल्याला विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या आम्हाला PPE किट, मास्क, ग्लोव्हजची कमी आहे. पेशंट व्यवस्थित सहकार्य करत आहेत. आता राहीला प्रश्न घरचा. क्वारंटाइन पेशंटची सेवा करत असल्याने मागच्या दाराने जावून आंघोळ करुन करुन मगच घरात जावं लागतं. मला एक मुलगी आहे दिड वर्षाची पण घरी गेल्यावर मी लगेच लाडाने तिला जवळ घवू शकत नाही. इतर नातलगही आहेत त्यामुळं खुप स्वत:ची खुप काळजी घ्यावी लागते.’

अशा भावनिक प्रसंगात न डगमगता त्या म्हणतात की, ‘हे संकट फक्त आपल्यावर नाही तर संपुर्ण जगावर आहे. अशा वेळी लोकांच्या कल्याणाकरीता मी काम करतेय याचं समाधान आहे.’

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/204139111014983/?t=0

- कौस्तुभ खातू

Updated : 7 April 2020 11:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top