Home > हेल्थ > डेंग्यूत सेक्सला ‘नाही’ म्हणा, कारण…

डेंग्यूत सेक्सला ‘नाही’ म्हणा, कारण…

स्पेनमध्ये एका व्यक्तीला लैगिंक संबंधांमुळे डेंग्यू झाल्याचं निदान करण्यात आहे. लैंगिक संबंधानंतर या व्यक्तीच्या शरीरात डेंग्यूच्या विषाणूंनी प्रवेश केला असल्याचं समोर आलं आहे.

डेंग्यूत सेक्सला ‘नाही’ म्हणा, कारण…
X

डेंग्यू म्हटलं की तो डास चावल्याने होतो हे आपल्याला माहित आहे. मात्र स्पेनमध्ये एका व्यक्तीला लैगिंक संबंधांमुळे डेंग्यू झाल्याचं निदान करण्यात आहे. लैंगिक संबंधानंतर या व्यक्तीच्या शरीरात डेंग्यूच्या विषाणूंनी प्रवेश केला असल्याचं समोर आलं आहे.

स्पेनच्या माद्रिद सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉ. सुझाना हिमेनेस यांच्या सांगण्यानुसार, “स्पेनच्या माद्रिदमध्ये राहणाऱ्या 41 वर्षीय पुरुषाला लैंगिक संबंधांनंतर डेंग्यू झाला. या व्यक्तीचा जोडीदार पुरुष असून तो क्युबामध्ये फिरायला गेला असताना डास चावल्याने या जोडीदाराला शरीरात डेंग्यूच्या विषाणूंनी प्रवेश केला.”

डॉ. सुझाना पुढे म्हणाल्या, “सप्टेंबरमध्ये या व्यक्तीला डेंग्यू असल्याचं निदान करण्यात आलं. मात्र ज्या देशात या डेंग्यूच्या आजाराचं प्रमाण आहे त्या देशात हा व्यक्ती गेला नव्हता. त्यामुळे डेंग्यूंच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केला कसा यामुळे आम्ही डॉक्टर देखील गोंधळलो होतो. त्याच्या जोडीदारालाही सारखीच मात्र सौम्य प्रमाणात लक्षणं जाणवत होती. त्याचा जोडीदार क्युबामध्ये फिरायला जाऊन आला होता.”

डॉ. सुझाना यांच्या सांगण्यानुसार, आम्ही दोन्ही जोडीदारांच्या स्पर्म्सची तपासणी केली. या तपासणीतून त्या व्यक्तीला डेंग्यू झाल्याचं लक्षात आलं.

युरोपियन सेंटर ऑफ डिसीज प्रिव्हेंशन अॅन्ड कंट्रोलच्या माहितीनुसार, हे पहिलं असं प्रकरण आहे. ज्यामध्ये समलैंगिक संबंधांद्वारे एका पुरुषाला डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार झालेला आढळून आला आहे.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना युनिसन मेडिकेअर अॅऩ्ड रिसर्च सेंटरच्या संसर्गजन्य आजाराच्या डॉ. तृप्ती गिलाडा म्हणाल्या, “लैंगिक संबंधांच्या मार्फत डेंग्यूचं इन्फेक्शन होणं शक्य आहे. मात्र हे फार दुर्मिळ आहे. सेमेनमध्ये डेंग्यूचा वायरस असतो. त्यामुळे लैंगिक संबंधांनंतर डेंग्यूचं निदान होण्याची शक्यता आहे. मात्र ज्या देशांमध्ये डासांमार्फत डेंग्यू पसरत नाही त्या ठिकाणी अशी प्रकरणं आढळून येऊ शकतात. भारतात असं होणं शक्य नाही. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही.”

-माय मेडिकल मंत्रा

Updated : 23 March 2020 5:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top