Home > हेल्थ > कोरोनाचा कहर! जगभरातील रुग्णांची संख्या ५२ लाख ८८ हजार

कोरोनाचा कहर! जगभरातील रुग्णांची संख्या ५२ लाख ८८ हजार

कोरोनाचा कहर! जगभरातील रुग्णांची संख्या ५२ लाख ८८ हजार
X

संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत जगातील 52 लाख 88 हजार लोक बाधीत झाले आहेत. तर 3 लाख 40 हजार 875 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार जगातील सुमारे 52 लाख रुग्णांपैकी 21 लाख 2 हजार 557 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेतील रुग्णांची संख्या 16 लाख 21 हजारांच्यावर गेली आहे.

तर मृतांची संख्या आता 97 हजारांच्यावर गेली आहे. तर अमेरिकेत 3 लाख 61 हजार लोक आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोनाबाधीत देशांच्या यादीत रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथे 3 लाख 35 हजार रुग्ण आहेत. तर ब्राझीलमध्ये 3 लाख 30 हजार रुग्ण आहेत. रशियामध्ये आता पर्यंत 3 हजार 388 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधीत देशांच्या यादीत भारत आता 11व्या स्थानावर आहे.

Updated : 24 May 2020 3:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top