Home > Max Woman Blog > पुर्वजांच्या शोधांचा शोध फेअर अँड लव्हली…

पुर्वजांच्या शोधांचा शोध फेअर अँड लव्हली…

पुर्वजांच्या शोधांचा शोध फेअर अँड लव्हली…
X

मी शाळेत असताना माझ्या एका शिक्षकांच्या घरी मी रोज जात असे. अगदी त्यांच्या घरी सर्वत्र माझा वावर असायचा. शनिवारी सकाळची शाळा. तेव्हा फक्त त्याच दिवशी ते मला आपल्या सोबत गाडीवरून शाळेत घेऊन जायचे. शनिवारी आमचे गुरुजी आवरत असताना मी त्यांच्या घरी जात असे. गुरुजींचा रंग काळा सावळा होता. त्याकाळी बाजारात आलेले फेअर अँड लव्हली ची ट्यूब ते वापरत असत. कारण ही क्रिम लावल्याने रंग गोरा होतो अशी जाहिरात होती. ते रोजच ह्या क्रिम चा वापर करत.

पूर्वीचे लोक त्वचेला हळद लावायचे. हळदीचे अनेक गुण सर्वांना माहीतच आहेत. आष्टा परिसरात तर अनेक हळद उत्पादक आहेतच. थोडक्यात आपल्या घरीच मुबलक आणि भेसळ नसलेली हळद उपलब्ध आहे. परंतु आज आपण हळद हि फक्त एक परंपरा म्हणून लग्नातच लावतो. हळद समारंभात. लग्नात वधू वरांच्या हातालाही हळकुंड बांधतात, अनेक धर्मांमध्ये देव देवतावरही हळद लावतात. असे करण्यामागे उद्देश काय? तर हे पाहून लोकांनीही ह्याचा अवलंब करावा.थोडक्यात ती एक शिकवण होती. हे झाले प्रतीकात्मक.परंतु आज आपणही रोज अंघोळीच्या वेळी हळद आणि डाळीचे पीठ देशी गाईच्या दुधात घालून लावल्यास खूपच फायदेशीर ठरते. तेही अल्प खर्चात कोणत्याही साईड इफेक्ट विना. ह्या पुर्वज्यांच्या परंपरेचा रोजच्या जीवनात वापर नक्कीच फायद्याचा आहे.

मूळ विषयावर येऊ...वरती उल्लेख केलेले माझे गुरुजी रिटायर होऊन बरीच वर्षे झाली. ते ही एक हळद उत्पादक आहेत. आज त्यांना भेटायला मी घरी गेलो असता ते नेहमीप्रमाणे आवरत होते. गुरुजींचा रंग पूर्वी होता तसाच आजही काळा सावळाच. त्यांच्या आरशा समोर अजूनही ते वापरत असलेली फेअर अँड लव्हली ची क्रीम पाहून मी विचार करत बसलो. कित्येक वर्ष अशी क्रीम वापरून ज्यांची त्वचा आहे तशीच आहे, त्याची लागलेली सवय, व्यर्थ गेलेले पैसे पाहून आपणही आशेपोटी अशा अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो. हे पाहून अनेकजण अनुकरणही करतात. मग त्याचा समावेश गरजेमध्ये होतो. परिणामी गरजा वाढत जातात. अगदी मोल मजुरी करणाऱ्या कुटुंबांनीही अशा गरजा वाढविल्या आहेत. असो... अशा अनेक गोष्टीत मन, तन आणि धन व्यर्थ जात आहे. पुन्हा विचार आला जे काही चाललंय त्या पेक्षा वेगळ काहीतरी आहे.

प्रीतम चौगुले

Updated : 3 July 2020 11:04 AM GMT
Next Story
Share it
Top