Home > Entertainment > अभिनेत्री कृतीका गायकवाडचा मुंबईच्या रस्त्यावर हॉट योगा

अभिनेत्री कृतीका गायकवाडचा मुंबईच्या रस्त्यावर हॉट योगा

अभिनेत्री कृतीका गायकवाडचा मुंबईच्या रस्त्यावर हॉट योगा
X

आज जागतीक योग दिनानिमीत्त अनेक कलाकारांनी आपले योगा करतानाचे फोटो व योगा टिप्स आपल्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. यात चर्चा होतेय ती अभिनेत्री कृतीका गायकवाडची. त्याला कारणही तसच आहे. कारण तिने मुंबईच्या रस्त्यांवर योगा केलाय.

बंदिशाळा या चित्रपटातून नावारुपास आलेल्या कृतिकानं चक्क मुंबईच्या रस्त्यावर एशियाटिक लायब्ररी समोर योगा केला. त्याचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. यावर कॅप्शनमध्ये तिनी "मुंबईकी बात ही कुछ और है.. राइट ना मुंबईकर" असं म्हटलं आहे.

त्यामुळे कृतीकाने योगासुट परिधान करुन केलेला हॉट योगा चर्चेचा विषय ठरतोय.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण केलं होतं. त्यावेळी योग त्यांनी योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत अन्य देशांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

Updated : 21 Jun 2021 8:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top