"येड्याचा बाजार अन् खुळ्याचा शेजार"; असं शशांक शेंडे का म्हणाले ?
X
चिन्मयनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करुन चिन्मयनं, 'यापुढे छत्रपती शिवरायांची भूमिका न साकारणार नाही' असं चाहत्यांना सांगितलं. व्हिडीओला चिन्मयनं कॅप्शन दिलं, "छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो". फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार या चित्रपटांमध्ये चिन्मयनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
चिन्मय व्हिडीओमध्ये म्हणाला, "नमस्कार, माझं नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायाने मी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. काल माझी पत्नी नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ माझ्या मुलाच्या जहांगीर या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलचा आहे. माझ्या कुटुंबाबद्दल अतिशय घाणेरड्या आणि अश्लाघ्य कमेंट्स पास केल्या जात आहेत. माझ्या पत्नीनं व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर देखील लोक कमेंट्स करत आहेत. आता लोकं मुलाच्या पितृत्वापासून ते आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर शंका घेऊ लागलेत. एक व्यक्ती म्हणून मला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे."
शशांक असं काय म्हणाला ?
अभिनेता चिन्मय मांडलेकर हा सध्या त्याच्या निर्णयामुळे चर्चेत आहे. चिन्मयला त्याच्या मुलाच्या 'जहांगीर' या नावामुळे सध्या ट्रोल केलं आहे. त्यामुळे नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगमुळे चिन्मयनं यापुढे छत्रपती शिवरायांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. आता एका मराठमोळ्या अभिनेत्यानं चिन्मयला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शशांक शेंडे यांनी चिन्मय मांडलेकरला ट्रोल करणऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. शशांक शेंडे यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "येड्याचा बाजार न खुळ्याचा शेजार, मुलाचं नाव "जहांगीर " ठेवले, म्हणून वाटेल त्या भाषेत चिन्मय मांडलेकर आणि त्याच्या घरच्यांना ट्रोल केलं जातं आहे , कलाकारच खासगी आयुष्य ही त्याची "खासगी बाब "आहे , कोणत्याही माणसाला त्यात "हस्तक्षेप " करण्याचा अधिकार नाही (महाराजांच्या भूमिकेचा संदर्भ घेवून ट्रोल केलं जातं आहे...कोणतीच नावे आपल्या समाजात कधीच निषिद्ध नव्हती , आणि पुढेही नसतील. अधिक माहितीसाठी.... मालोजी राजांना 2 मुलं होती- 1)...शहाजी 2)...शरीफजी नावांचे संदर्भ समजावेत ही माफक अपेक्षा आहे.