Home > Entertainment > यामी गौतमीचा "LOST " ठरणार का "BEST"?

यामी गौतमीचा "LOST " ठरणार का "BEST"?

यामी गौतमीचा LOST  ठरणार का BEST?
X


यामी गौतमी "फेअरलवली गर्ल" म्हणून सुरुवातीला सर्वांना माहित होती . आजही तिला पाहिल्यानंतर तिच्या जुन्या जाहिरातींची आठवण होते. जाहिरातीनंतर जेंव्हा यामी गौतमीने सिनेमामध्ये एन्ट्री केली तेंव्हा प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिले आहे .त्यामुळे यामी गौतमी आपल्याला अनेक सिनेमांमद्ये पाहायला मिळत आहे . आताही तिचा एक नवीन सिनेमा येत आहे ."LOST "नावाच्या तिच्या सिनेमाचा ट्रेलर १ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे . यामध्ये काय स्टोरी पाहायला मिळणार ? वाचा संपूर्ण माहिती

यामी गौतमी एक Journalist ची भूमिका साकारत आहे .ट्रेलरच्या सुरुवातीलाच एक मुलगा हरवल्याची तक्रार पालक पोलीस स्टेशन मध्ये करताना दिसतात . यावर यामी मुलगा हरवल्याची बातमी करते पण बातमीमागची बातमी शोधण्याचा तिचा संपूर्ण प्रयत्न यामी करताना दिसणार आहे . यामध्ये मुलगा हरवल्याची स्टोरी तर आहेच पण त्यामागे एक lovestory असल्याचं यामी बोलताना दिसते . हा मुलगा बेपत्ता कसा झाला याचा शोध ती घेते . पण यादरम्यान हे प्रकरण राजकारणापर्यंत पोहचलेले दिसते . त्याचबरोबर यामध्ये तो दहशतवादी होतो का ? त्याच काय होत ? याचा शोध घेताना यामी गौतमी दिसली आहे .

संपूर्ण चित्रपटात तिला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागणार असल्याचे ट्रेलर मद्ये दाखवण्यात आले आहे . पण एक पत्रकार काय करू शकतो ? त्यामध्ये एक महिला पत्रकार म्हणून सत्याची पडताळणी करताना तिची होणारी दमछाक सुद्धा दाखवली आहे . तरीही ती तिच्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी धडपडताना दिसत आहे . महिला पत्रकार सोबतच सर्व महिलांसाठी प्रेरणा देणारा हा सिनेमा ठरेल अशी चर्चा सध्या सुरु आहे . १६ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे .

Updated : 3 Feb 2023 8:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top