Home > Entertainment > सुष्मिता सेन लग्न करणार ... ?

सुष्मिता सेन लग्न करणार ... ?

अभिनेत्री सुष्मिता सेन 'आर्या ३' वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. नुकतीच तिने एका मुलाखतीत लग्नाबाबत भाष्य केले आहे.

सुष्मिता सेन लग्न करणार ... ?
X

अभिनेत्री सुष्मिता सेन 'आर्या ३' वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. नुकतीच तिने एका मुलाखतीत लग्नाबाबत भाष्य केले आहे.

सुष्मिता सेन 48 वर्षाची असून तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल हा 33 वर्षाचा आहे. दोघांच्या वयात १५ वर्षांचा फरक आहे. अनेकदा ते दोघे एकत्र दिसतात आणि त्यांच्या लग्नाच्या अफवाही सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकतीच 'आर्या ३'च्या प्रमोशनमध्ये सुष्मिताने या अफवांवर भाष्य केले असून, लग्नसंस्थेवर तिचा पूर्ण विश्वास असल्याच म्हणत असताना तिने ‘आर्या’ वेब सीरिजचे दिग्दर्शक राम माधवानी आणि निर्माती अमिता माधवानी या जोडप्याच उदाहरण दिले आहे.

"मी किमान वयाच्या या टप्प्यावर तरी सेटल होण्याचा विचार करावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे, हे मला ठाऊक आहे. मला कोणत्याही गोष्टीची परवा नाही. माझा लग्नसंस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे, मी त्यावर प्रेमही करते. मी त्याचा सन्मानही करते. मी माझ्या आयुष्यात अनेक चांगल्या कपल्सला ओळखते. माझ्यासमोरच ‘आर्या’ वेब सीरिजचे दिग्दर्शक राम माधवानी आणि निर्माती अमिता माधवानी यांचं उत्तम उदाहरण आहे." असल्याच सुष्मिता सेन म्हणते

"माझा लग्नापेक्षा मैत्रीवर विश्वास आहे आणि कोणत्याही नात्यात मैत्री असते. जर तुमच्या मैत्रितलं नातं खूप चांगलं असेल तर कोणत्याही गोष्टीची परवा करण्याची गरज नाही. मग इतरत्र गोष्टीही आपोआप घडतात. आपल्या नात्यामध्ये स्वातंत्र्य खूप महत्वाचं आहे." असंही ती म्हणाली.

सुष्मिता आणि रोहमनचं नातं म्हणजेच रिलेशन २०१८ पासून आहे. २०२० मध्ये त्यांनी ब्रेकअप घेतला होता, पण २०२३ मध्ये पुन्हा एकत्र आले. सुष्मिताने लग्नाबाबत स्पष्टपणे काहीही बोलल नाही. तिने लग्नसंस्थेवर विश्वास असल्याचे म्हटले असून, सध्या ती लग्नाच्या विचारात नसल्याचे दिसून येते.


Updated : 8 Feb 2024 6:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top