Home > Entertainment > सलमान खानने बेरोजगार आयुष शर्मासोबत का लावून दिलं अर्पिताचं लग्न?

सलमान खानने बेरोजगार आयुष शर्मासोबत का लावून दिलं अर्पिताचं लग्न?

सलमान खानने बेरोजगार आयुष शर्मासोबत का लावून दिलं अर्पिताचं लग्न?
X

कोणाच्या आयुष्यात कधी तारे चमकतील, कधी आनंदाचे वारे वाहतील हे सांगणे कठीण आहे. पण आयुषच्या आयुष्यात सलमान खानची बहीण म्हणजेच अर्पिता खान एंट्रीने आयुषच्या आयुष्यात दिवसात तारे चमकू लागले... काय आहे तो किस्सा ज्याने आयुषचे आयुष्य बदलले ?

bolywood दबंगस्टार सलमान खान ची लाडकी बहीण अर्पिता खानचं लग्न २०१४ मध्ये दिल्लीतील व्यवसायिक आयुष शर्मासोबत झालं. लग्नाच्या वेळी आयुष बेरोजगार होता हे सलमान खानला देखील माहिती आसतांना अर्पिताचं लग्नं सलमानने काहीच कमवत नसलेल्या आयुषशी का लाऊन दिलं.

त्याचं कारण एकदा रात्रीच्या दीड वाजता आयुष आणि अर्पिता बिर्याणी खाण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये होते. त्याचवेळी सलमान तिथे आला आणि त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. बॉलीवूडमध्ये सलमानला बघून चांगल्या चांगळ्यांना घाम फुटतो, पण येथे असे घडले नाही. आयुषने सलमानला hi hello by म्हणाला आणि तो तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सलमानने आयुषला भेटून त्याच्या कामांबद्दल विचारलं. आयुषने सांगितलं की मी अर्पितासोबत लग्न करू इच्छितो आणि माझ्याकडे पैसे नाहीत.

अभिनेता सलमान खानने त्याची लाडकी बहीण अर्पिताचे लग्न आयुष शर्माबरोबर लावून दिले. तो काळ होता 2014 चा मात्र, आयुषने सांगितल्यानुसार अर्पिताशी लग्न करत असताना तो काहीही कमवत नव्हता. आयुषने भारती सिंगच्या 'कॉमेडी नाइट्स विद भारती' या शोमध्ये खुलासा केला असून आयुष म्हणतो सलमानने मला विचारले “अर्पितासाठी तुझा भविष्यातील प्लॅन काय आहे?” यावर आयुषने सलमानला सांगितले की त्याला अर्पिताशी लग्न करायचे आहे. यावर सलमानने त्याला विचारले की तो किती कमावतो? त्यावेळी आयुष सांगतो की मी एकही रुपया कमवत नाही आणि घरातूनच पैसे घेत असतो.

या प्रामाणिकपणामुळे सलमान खान खूपच प्रभावित झाला आणि त्याने लगेचच अर्पिताला लग्नास मंजूरी दिली.

यानंतर आयुष सलीम खान यांना भेटला आणि त्यांनीही या नात्याला स्वीकारलं. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची बोलणी झाली आणि २०१४ मध्ये अर्पिता आणि आयुषचं लग्न झालं.

सध्या अर्पिता आणि आयुष दोन मुलांसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. आयुषने २०१८ मध्ये 'लव्हरात्री' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तो 'अंतिम' चित्रपटात दिसला. आता त्याचा 'रुस्लान' हा चित्रपट २६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे।

Updated : 15 April 2024 7:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top