Home > Entertainment > पठाण चित्रपटाची खरी कमाई किती? दोन दिवसाच्या कमाईत अनेक रेकॉर्ड ब्रेक..

पठाण चित्रपटाची खरी कमाई किती? दोन दिवसाच्या कमाईत अनेक रेकॉर्ड ब्रेक..

पठाण चित्रपटाची खरी कमाई किती? दोन दिवसाच्या कमाईत अनेक रेकॉर्ड ब्रेक..
X

शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ५५ कोटींची बंपर ओपनिंग केली. बॉलिवूडच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वाधिक कलेक्शन करणारा हा चित्रपट ठरला आहे. याआधी हृतिक रोशनच्या 'वॉर' या चित्रपटाने पहिल्या दिवशी 51.6 कोटींचे कलेक्शन केले होते. आता पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी केलेल्या या कमाई नंतर आता दुसऱ्या दिवशीची कमाई किती हाती माहित आहे का? तर समाजमाध्यमांवर हा चित्रपट फ्लॉप असल्याचे अनेक मेसेज व्हायरल होत आहेत पण कमाई बघून तुम्हाला समजेल पिच्चर फॉलोप की हिट..

दुसरीकडे पठाणने जगभरात पहिल्याच दिवशी 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट जगभरात 8 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. पठाण रिलीजपूर्वी बराच वादात सापडला होता. चित्रपटातील बेशरम या गाण्यात दीपिकाने घातलेल्या कपड्याचा रंगावरून या गाण्याबाबत देशातील अनेक ठिकाणी निदर्शने झाली होती. गाण्यातील दीपिकाच्या कपड्यावर आंदोलकांनी आक्षेप घेतला होता.

चित्रपट तीन दिवसांत ३00 कोटींच्या वर कमाई..

पठाणने पहिल्या दिवशी 55 कोटींची कमाई केली आहे. आज तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत जगभरातील अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. आतापर्यंत या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत.

सुरुवातीच्या दिवशी 300 स्क्रीन वाढल्या...

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पठाण जगभरात 8 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट हिंदी तमिळ आणि तेलगूसह 5 हजार 500 स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. त्याचबरोबर या चित्रपटाला परदेशात 2 हजार 500 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. सुरुवातीला हा चित्रपट 5 हजार 200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता, मात्र चित्रपटाची क्रेझ पाहता आणखी 300 स्क्रीन्स वाढवण्यात आल्या आहेत. पठाणच्या रिलीजसह कोविड दरम्यान बंद झालेल्या 25 सिंगल स्क्रीन पुन्हा उघडण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती शाहरुखने स्वत: त्याच्या सोशल मीडियावरून दिली आहे...

Updated : 28 Jan 2023 12:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top