Home > Entertainment > वीर-झाराचा जादू पुन्हा; शाहरुख-प्रीतीचा तो व्हिडिओ व्हायरल

वीर-झाराचा जादू पुन्हा; शाहरुख-प्रीतीचा तो व्हिडिओ व्हायरल

वीर-झाराचा जादू पुन्हा; शाहरुख-प्रीतीचा तो व्हिडिओ व्हायरल
X

'कभी अलविदाना कहना', 'कल होना हो' या सारख्या चित्रपटात झळकनारे सितारे, याच काळात म्हणजेच २० वर्षांपूर्वी 'वीर-झारा' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित करतात आणि तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आपली जादू निर्माण करून जातो. या चित्रपटाला यशाच्या शिखरावर आणि तरुणाईच्या मनात घेऊन जाणाऱ्या शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही सर्वात चांगल्या रोमँटिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. शाहरुख आणि प्रीतीचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

'वीर-झारा' चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. यात शाहरुख खानने भारतीय वायुदलाच्या पायलट वीर प्रताप सिंह आणि प्रीती झिंटाने पाकिस्तानी मुलगी जारा हयात खानची भूमिका साकारली होती. या चित्रपटात राणी मुखर्जी, दिव्या दत्ता, मनोज वाजपेयी, अखिलेंद्र मिश्रा आणि अनुपम खेर यांसारख्या कलाकारांनीही काम केले होते. 'वीर-झारा' ला २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

'वीर-झारा' हा चित्रपट प्रदर्शित होऊन २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, शाहरुख आणि प्रीतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख आणि प्रीती 'वीर-झारा' मधील 'तेरे लिए हम भी जिए...' या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. तर प्रीतीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून तिने त्याला "आम्ही एका अवॉर्ड शोसाठी रिहर्सल करत होतो..." असे कॅप्शन दिले आहे.

व्हिडीओसोबत प्रीतीने एक लांब पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ती लिहते, "मला आठवते की मला २ दिवस झोप लागली नाही आणि मी झोम्बीसारखी दिसत होते. पण शाहरुखने त्याच्या विनोदांनी आणि मोहक व्यक्तिमत्त्वाने तो दिवस आणि रिहर्सल खूप सुंदर बनवले. त्याने मला पकडले आणि आम्ही 'जिया जले' मधील स्टेप्स केले." असे प्रीतीने इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये लिहिले आहे.

प्रीती आणि शाहरुखचा हा थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करून 'वीर-झारा' चित्रपटाचे आणि त्यातील गाण्यांचे कौतुक केले आहे.

हा थ्रोबॅक व्हिडीओ 'वीर-झारा' चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक नयनरम्य क्षण आहे. शाहरुख आणि प्रीतीची केमिस्ट्री आणि चित्रपटातील गाण्यांचा मधुर आवाज प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्या रोमँटिक जगात घेऊन जातो.

Updated : 23 March 2024 10:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top