Home > Entertainment > Kapil Sharma Show मध्ये ढगाला लागली कळ ,वर्षा उसगांवकर यांनी गायलं गाणं

Kapil Sharma Show मध्ये ढगाला लागली कळ ,वर्षा उसगांवकर यांनी गायलं गाणं

Kapil Sharma Show मध्ये ढगाला लागली कळ ,वर्षा उसगांवकर यांनी गायलं गाणं
X


वर्षा उसगांवकर हे मराठीतील सिनेसृष्टीतील नाव हिंदीत सुद्धा गाजलं आहे . वर्षा उसगांवकर यांचे हिंदीतील चित्रपट आणि त्या चित्रपटातील गाणे आजही लोकांच्या ओठांवर आहेत.पण सध्या मालिका आणि नाटक यामधून वर्षा उसगावकर या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या घर करत आहे.
वर्षा उसगांवकर सामाजिक तसेच मनोरंजन क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात.त्यांचा सोशल मीडियावरील सुद्धा त्या नेहमी अपडेट असतात. वेगवेगळ्या कार्यक्रमाचे फोटोज आणि स्वतःचे जुन्या चित्रपटातील फोटो त्या पोस्ट करत असतात.

नुकतंच वर्षा उसगांवकर या कपिल शर्मा शो मध्ये गेल्या होत्या तेथील काही खास फोटो त्यांनी चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. निळ्या रंगाची पैठणी त्यांनी खास कपिल शर्मा शो मध्ये घातली आहे आणि पारंपारिक मराठमोळा लुक करून त्यांनी कपिल शर्मा शो मध्ये रंगत आणली. त्यांच्यासोबत संगीता बिजलानी आणि मंदाकिनी या अभिनेत्री सुद्धा होत्या.
वर्षा उसगांवकर यांच्या पोस्टला मराठी माणसांसाठी कौतुकाची गोष्ट असल्याच्या कमेंट सुद्धा आल्या आहेत . या शोमध्ये वर्षा उसगावकर यांनी ढगाला लागली कळ हे गाणं गायलं सुद्धा आहे आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आहे.
Updated : 27 May 2023 6:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top