Latest News
Home > Entertainment > "आता मी त्यांना काळं करणार...", मायराने दिली या कलाकाराला धमकी....

"आता मी त्यांना काळं करणार...", मायराने दिली या कलाकाराला धमकी....

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मायरा वैकूळ हि नुकतीच आई विना मला करमत नाही या गाण्यात झळकली आहे.

आता मी त्यांना काळं करणार..., मायराने दिली या कलाकाराला धमकी....
X

झी मराठी वर सुरू असलेल्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतली परी म्हणजेच मायरा वायकूळ ही अनेकांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. मायरा वायकुळ हिचा अभिनय असलेले एक गाणे सध्या चांगलेच चर्चेत आहे. 'आई विना मला करमत नाही' या गाण्याला सध्या चांगलाच प्रतिसादत मिळतोय. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान तिने भरपूर मजामस्ती केल्याचे पाहायला मिळत आहे. आणि त्याचे अनेक किस्से तिने सांगितले आहेत.

या गाण्याच्या चित्रीकरण्यादरम्यान मायराला तिचे सीन कसे करायचे याची माहिती दिली जात होते. यातील एका दृश्यात तिला पाण्यात जाऊन शूटींग करायचे होते. मात्र यादरम्यान मायरा फारच घाबरली होती. त्यावेळी तिला ती पाण्यात पडेल की काय अशी भीतीही वाटत होती. यामुळे ती पायात चप्पल घालूनच पाण्यात उतरली होती, असे तिने एका मुलाखतीत बोलताना सांगितले.

तसेच हे गाणं एखाद्या खेड्यातील मुलीवर चित्रीत करण्यात आलं आहे, असे दाखवणे गरजेचे होते. त्यासाठी मायराला साजेसा मेकअप करण्यात आला होता. पण यादरम्यान मायराच्या चेहऱ्यावर काळा रंग लावण्यात आला होता. यावर तिने एक मिश्किल तक्रार केली आहे.

'मला मेकअप दादानी काळं केलं आहे. त्यामुळे आता मी त्यांना काळं करणार, अशी तक्रार मायराने बोलून दाखवली. तसेच मी आता काळी दिसत आहे. माझ्या अंगावरील हा रंग जात नाही. त्यामुळे पुढच्यावेळी मला गोरं दाखवायचं', असे देखील ती यावेळी सर्व क्रूला म्हणाली. मायराने केलेल्या या तक्रारीवर अनेकजण खळखळून हसू लागले.

मायराच्या 'आई विना मला करमत नाही' या गाण्याला अल्पावधीतच प्रेक्षकांनी देखील पसंती दर्शवली आहे. कोलीवूड प्रस्तुत 'आई विना मला करमत नाही' या गाण्याचे दिग्दर्शन प्रवीण कोळी यांनी केलं आहे. तर दिया वाडकर आणि स्नेहा महाडिक यांनी हे गाणं गायलं आहे. मायरासोबत अभिनेत्री अंकिता राऊत या दोघी माय लेकीच्या मुख्य भूमिकेत झळकताना दिसत आहेत. हे गाणं चित्रीत होत असताना लहानग्या मायराने भरपूर मजामस्ती केलेली पाहायला मिळत आहे.

Updated : 18 March 2022 5:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top