Home > Entertainment > ‘थेट CM..’उर्वशी रौतेला जोरदार ट्रोल...

‘थेट CM..’उर्वशी रौतेला जोरदार ट्रोल...

‘थेट CM..’उर्वशी रौतेला जोरदार ट्रोल...
X

उर्वशी रौतेला यांची एक इंस्टाग्राम पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. ही चर्चा उर्वशीच्या एका चुकीमुळे सुरू आहे. ज्यामुळे लोक तिला सध्या ट्रोल ही करतं आहेत. उर्वशीने अशी नक्की काय चुकी केली? ज्यामुळे हा सगळा गदारोळ सुरू आहे. तर झाला असं कि, उर्वशीने सोशल मीडियावर पोस्ट करत पवन कल्याण यांना अंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हटलं... मग चर्चा तर होणारच. इतकच नाही तर त्यांच्यासोबतचा फोटो देखील त्यांनी शेअर केला.. लोकांनी तर थेट कमेंट करत उर्वशीला सांगितले (YS Jagan Mohan Reddy) वायएस जगन मोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत पवन कल्याण नाही. नक्की हा सगळा प्रकार काय आहे पाहुयात पुढच्या एका मिनिटांमध्ये...

उर्वशी रौतेला आणि पवन कल्याण २८ जुलै रोजी रिलीज होणाऱ्या 'ब्रो' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. उर्वशी रौतेलाने अलीकडेच ट्विटरवर 'ब्रो' स्टार्स पवन कल्याण आणि साई धरम तेजसोबतचा एक फोटो शेअर केला आहे व याच फोटोला दिलेल्या caption मध्ये पवन कल्याण यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हटले आहे. बस झालं न मग हे ट्विट व्हायरल आणि त्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली... उर्वशी रौतेलाने लिहिले की, 'ब्रो: द अवतार' या चित्रपटात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना आनंद झाला. हा चित्रपट २८ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची कथा अशा जिद्दी व्यक्तीची आहे, ज्याला मृत्यूनंतर त्याच्या चुका सुधारण्याची संधी दिली जाते. जेव्हा हे ट्विट व्हायरल झाले तेव्हा लोकांनी तिची खिल्ली उडवण्यास सुरवात केली...

Updated : 29 July 2023 11:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top