Home > Entertainment > कुणी घर देतं का घर ? उर्फीची मुंबईकरांना भावनिक साद

कुणी घर देतं का घर ? उर्फीची मुंबईकरांना भावनिक साद

कुणी घर देतं का घर ? उर्फीची मुंबईकरांना भावनिक साद
X

गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद (Uorfi Javed) च्या कपड्यावरून चित्रा वाघ विरुध्द उर्फी जावेद (Uorfi vs Chitra wagh) वाद रंगला आहे. चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला उर्फी जावेद यांच्याकडून उत्तर दिले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर उर्फी जावेदने कुणी घर देतं का घर? म्हणत उर्फीने मुंबईकरांना भावनिक साद घातली आहे.

उर्फी जावेदच्या कपड्यावरून चित्रा वाघ यांनी टीका करत हा नंगटनाच थांबवण्याची मागणी केली. त्यानंतर उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना उत्तर देत चित्रा वाघ यांचा सासू असा उल्लेख केला होता. त्यानंतर चित्रा वाघ विरुध्द उर्फी जावेद वाद रंगला होता. त्यातच आता उर्फी जावेदने तिला मुंबईमध्ये कुणी भाड्याने घर देत नसल्याचे म्हटले आहे. याबाबत उर्फी जावेदने ट्वीट केले आहे.

उर्फीने ट्वीट (uorfi javed tweet) करून म्हटले आहे की, मी कमी कपडे परिधान करते. त्यामुळे मला मुस्लिम लोक घर देत नाहीत आणि मी मुस्लिम आहे म्हणून मला हिंदू लोक घर देत नाहीत. एवढंच नाही तर मला राजकीय धमक्या येत असल्याने काही लोकांनी घर देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुंबईत मला घर शोधणं अवघड जात असल्याचं मत उर्फीने ट्वीट करून केले आहे.

त्यामुळे उर्फीच्या कपड्यांवरून सुरु झालेल्या वादामुळे तिला आता घर मिळणेही अवघड झाले आहे. त्यामुळेच उर्फीवर कुणी घर देतं का घर..? असं म्हणण्याची वेळ आली आहे.

Updated : 25 Jan 2023 3:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top